पान:तर्कशास्त्र.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तेिसंरा. ?&& खरा आहे असें त्या धर्माचा जय झाला एवढ्यावरून सिद्ध होत नाहीं, कारण महंमदी धर्माचाही जय झाला आहे; किंवा त्यांतील अद्भुत चमत्कारांवरूनही सिद्ध होत नाही, कारण पुष्कळ खोट्या धर्मामध्येंही कांहीं अद्वत चमत्कार झाले आहेत असें सांगतात. ” परंतु अशा प्रकारच्या ( निषेधरूप ) प्रमाणांवरून, कोणतेंही विधिरूप निगमन काढितां येणें शक्य नाहीं, व ' खिस्तीधर्म सिद्ध करण्यास कोणतेंच प्रमाण नाहीं ? असें निगमन तर खचित काढतां येणार नाहीं. ७६. ४. तिहींपेक्षां अधिक पदांची अनुमानेोक्ति( भाग ३, कलम ८ पहा). प्रत्येकजण सुखाची इच्छा करितो; सदुणापासून सुख उत्पन्न होतें; ह्मणून प्रत्येकजण सदुणाची इच्छा करितो ” या अनुमानांत भरपूर पांच पर्दे आहेत; तीं हीं, 'प्रत्येकजण,' 'सुखाची इच्छा करणारा,' 'सदुण,' 'सुख उत्पन्न होणें ? व ‘स- दुणाची इच्छा करणारा.? तसेंच, ‘ संध्या न करणें हें पाप आहे; व सरकारानें पापाबद्दल शिक्षा केली पाहिजे; ह्मणून सरकारानें संध्या न करण्याबद्दल शिक्षा केली पाहिजे.' या अनुमानांत तिहींहून अधिक पदें आहत हैं न दिसल्यामुळे यांतील हेत्वाभास झांकला जातो, परंतु ही अनुमानोति स्पष्टपणें मांडली ह्मणजे यांतील दोष ताबडतोब उघडकीस येती, तें असें; (कांही) पापाबद्दल सरकारानें शिक्षा केली पाहिजे; सध्या न करणें हें एक पाप आहे;