पान:तर्कशास्त्र.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १९३ परंतु इंग्रजी तर्कशास्त्रांत, अनुमानवाक्याच्या स्वरूपावषयीं किंवा अनुमानक्रियेविषयीं जे ठरीव नियम आहेत, त्यांच्या उल्लंघनामुळे झालेल्या हेत्वाभासास ' तर्कशास्त्रीय हे.त्वाभास ' हें नांव दिलें आहे. व हे हेत्वाभास न्यायशास्त्रांतील * अनुमितकरणप्रतिबंधक ' हेत्वाभासाशीं जुळतात. व खेोट्या प्रतिज्ञा गृहीत धरल्यानें उत्पन्न होणा-या हेत्वाभासांस ‘ विषयक हेत्वाभास ? असें नांव दिलें आहे, व हे हेत्वाभास न्यायशास्त्रांतील * अनुमितिप्रतिबंधक ? हेत्वाभासांशीं जुळतात. न्यायशास्त्रांतील सवे हेत्वाभास (कमी किंवा अधिक अंशानें ) विपयक आहेत अशी साधारण समजूत आहे. व या समजुतीप्रमाणें, न्यायशास्त्रांतील, साधारण, व्याप्यत्वासिद्ध, व विरुद्ध हे हेत्वाभास खोटी महत्प्रतिज्ञा गृहीत धरल्याचीं उदाहरणें होत, व आश्रयासिद्ध व स्वरूपासिद्ध हीं खोटी अल्पप्रतिज्ञा गृहीत धरल्याचीं उदाहरणें होत. न्यायशास्त्रांत हेत्वाभास पांचच प्रकारचे कल्पिले आहेत; ते असे. अनैकांतिक, विरुद्ध सतिपक्षु, असिद्ध बू बाधित. ज्या हेतूंत व्यभिचार असतो तो अनेकांतिक होय. हा तीन प्रकारचा आहे, साधारण, असाधारण व अनुपसंहारी. यपैिकीं पक्ष, सपक्ष आणि विपक्ष या तिन्हीं ठिकाणीं आढळणारा हेतु साधारण होय. जसें, पर्वत धूमवान् आहे, कारण तेथें वन्हि आहे. ज्यावरील साध्यरूपी धर्म निश्चित असतो असा जो धर्मी तो सपक्ष. जर्से ( वरील उदाहरणांत) पाकशाला. ज्यावरील सध्याचा अभाव निधित असतो तो विपक्ष, जर्से, तापलेलें लोखंड, सपक्ष