पान:तर्कशास्त्र.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8&o तकैशास्त्र.. परीक्षा करण्याची, व तो पुरावा निगमन काढण्यास केितंपत सबळ आहे हें पाहण्याची संवय आपल्या मनास लागते. त्याचप्रमाणें, अशुद्ध अनुमानांचे साधारण प्रकार किती आहेत, व त्यांत चूक असण्याचीं ठिकाणें कोणकोणतीं आहेत, याचें ज्ञानही अत्यंत उपयोगीं आहे. अशा प्रकारचें शिक्षण मिळाल्यानें " आपल्या मनास अशी संवष्यच लागेल किं तिच्या योगानें आपणांस आपेोआप शुद्ध रीतीनें अनुमान करितां येऊं लागेल, व आपल्यामध्यें कुशाग्र बुद्धि, सूक्ष्म दृष्टि व दक्षता हीं उत्पन्न होतील, व असें झाल्यानें आकस्मिक प्रवृत्तीनें, शब्दांच्या अवडंबरानें किंवा दणाणणा-या वक्तृत्वानें आपण फसले जाणार नाहीं. व्यवहारांत नेहमीं आपण असें पाहतों कीं, शुद्ध बोलणा-यास व लिहिणा-यास आपली वाक्यें प्रथम जुळविल्याशिवायच शुद्ध रीतीनें बोलतां व लिहितां येत असतें, परंतु यार्च कारण हैं आहे कीं, तो पूर्वी व्याकरण शिकलेला असतो; तसेंच नियमांकडे पाहिल्याशिवायच गणिती आपले हिशोब बिनचूक करीत असतो, याचें कारण ती संवय त्याचा केवळ स्वभावच बनून गेलेली असते. याचप्रमाणें सरळ विचार करणा-यास, अनुमानपद्धतीच्या नियमांकडे लक्ष दिल्याशिवाय, एकादी लांबच लांब अनुमानपरंपरा देखील करितां येते, परंतु ही सर्व कुशलता तर्कशास्त्राच्या शिक्षणानेंच आलेली असेल, व प्रारंभापासून अखेरपर्यंत अनुमानपद्धतीच्या नियमांचा उपयोग न कळत होत असेल. आणि ज्याप्रमाणें एकाद्या ग्रंथकारांस, त्याच्या ग्रंथाच्या भाषेविषयीं वाद उत्पन्न