पान:तर्कशास्त्र.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १७३ सिद्धांत अंशतःच खरा असू शकतो, मग ते अंश कधीं कमी असतील कधीं जास्त असतील. प्रत्यक्ष प्रमाणाच्या सिद्धांतांत अधिक प्रमाणाची भर घालतांच येत नाही. दोन सरळ रेषा एकमेकांवर पडून झालेले समोरासमोरचे कोन परस्परांबरोबर असतात हें कोणत्याही जास्त पुराव्यानें अधिक निश्चयात्मक करितां येणार नाहीं. परंतु अनुभवजन्य प्रमाणाची गोष्ट निराळी आहे, कार! त्यांतील निश्धयात्मकता निरनिराळ्या अंशानें असू शकॅते. उद्यां सूर्य उगवेल यापेक्षां उद्यां पाऊस पडेल हा सिद्धांत अतिशय अनिश्धयात्मक आहे. या प्रकारच्या पुराव्यांत भर घालतां येण्याजोगी आहे. कारण वायुमापक यंत्रांतील पारा खाली पडला असतां व आकाश मेघाच्छादित झालें असतां पाऊस पडण्याचा संभव अधिक वाढेल. याप्रमाणें जितकीं जितकीं अधिक प्रमाणें मिळतील तितकी तितकी अधिक खात्री होत जाईल. ( ३ ). प्रत्यक्ष प्रामाण्यांतील सिद्धांतास कोणतीही गोष्ट बाह्यतः देखील विरोधी असणार नाही. परंतु अनुभवजन्य प्रमाणांत साधारणपणें, बाह्यतः विरोधी दिसणा-या प्रमाणांची तुलना केलेली असते, ह्मणजे बहुतकरून एका गोष्टीचा अगर प्रमाणाचा कल एकीकडे दिसतो व दुसरीचा विरुद्ध बाजूकडे भासतो; व यापासून अखेरचें निश्ध्यात्मक अनुमान काढतांना, आपणांस या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देऊन प्रत्येकीचें महत्व किती आहे हें पाहावं लागतें. कोणत्याही मालाची ठोकळ खरेदी करितांना व्यापा-यास, ज्याचे परिणाम फार दूरवर पॅौंचणारे आहेत अशा एकाद्या