पान:तर्कशास्त्र.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ तर्कशास्त्र. गतीसंबंधी तीन नियम, मृटपदार्थीचें वर्गाकरण, पदार्थाचे रासायनिक संयोग), मानसशास्त्राचे सिद्धांत (जसें, अनुमानपद्धतीविषयीं, उपजतबुद्धीविषयींव कल्पनांच्या साहचर्याविषयीचे नियम) इत्यादि. प्राचीन काळच्या अनुमान करणा-यां- पेक्षां हर्लींच्या अनुमान करणा-यास हा एक मोठा फायदा आहे कीं प्राचीन कालापासून आजपर्यंत सांपडलेलीं त-हत-हेचीं असंख्य सामान्य तत्वें त्याजपुढे आयतींच मांडली गेलीं आहेत. याशिवाय इतर जे सिद्धांत प्रसिद्ध झाले आहेत ते नीतिविषयक व व्यवहाराष्पयोगी आहेत. उदाहरणार्थ, बापापासून मुलाकडे व एका पिढीपासून दुस-या पिढीकडे चालत आलेल्या ह्मणी व बोधवचनें; जसें, ' यथा राजा तथा प्रजा ? * उद्योगाचे घरी ऋद्धिसिद्धी पाणी भरी ? इत्यादि. याशिवाय दुसरे अनेक नियम किंवा सिद्धांत असे आहेत कीं ते शब्दांनीं आजपर्यंत कधीही व्यक्त करतां आले नाहींत व पुढेही कधीं करितां येणार नाहींत. उदाहरणार्थ, तुह्मांस असा एकादा मनुष्य आढळतो की त्यावर आपणांस पूर्णपणें विश्वास टेवितां येईल असें तुह्मांस वाटर्त, व त्याचें वचन तुह्मीं खरें मानतां व त्याचे हातांत आपली जिनगी देण्यासही तुह्मांस दिकत वाटत नाहीं. अथवा असें समजा कीं, अमुक एक चेहरा व वागणुक हीं लबाडीचीं व बेभरवंशाचीं चिन्हें आहेत असें तुह्मांस आढळलें आहे. असें असल्यास, हा चेहरा व ही वागणूक तुह्मांस ओळखतां येतील, परंतु त्यांचें वर्णन करितां येणार नाही. अशा प्रकारचे ठोकळ सिद्धांत दररोजच्या व्यवहारांत व सर्व जीवन