पान:तर्कशास्त्र.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ तकशास्त्र जो दुस-यास सोमल चारतो, त्यानें त्यास विष घातलें असें होतें; was a va ܟܕ जो दुस-यास विष घालतो, त्यानं त्याचा खून केला असें होतें; जेो खून करील त्यास फांशी दिले पाहिजे; ' ज्यास फांशी द्यावयाचें आहे त्यास प्रसिद्धपणें फांशी देऊं नये. .. या कैद्यास प्रसिद्धपणें फांशी देऊं नये. मालूनुमृानामध्यें सिद्धांताची एक मुलाच असते व ती अशी कीं, त्यापैकीं प्रत्येक सिद्धांताचें विधेय पुढील सिद्धांताचें उद्देश्य असतें, व अगदीं अखेरीस शेवटच्या सिद्धांताचें विधेय निगमनाचें विधेय होतें व अगदीं प्रारंभीच्या सिद्धांताचें उद्देश्य निगमनाचें उद्देश्य पद होतें. मालानुमानांत, प्रारंभीचा सिद्धांत व निगमन खेरीज करून, बाकी एकंदर जितके सिद्धांत असतात तितकींच मध्यपदे असतात. मालानुमानांत, फक्त प्रारंभीचा सिद्धांत ( व निगमन ) एकदेशी असू शकेल; कारण पहिल्या हेतुस्थितींत अल्पप्रतिज्ञा एकदेशी असू शकेल, पण मह त्प्रतिज्ञा अधूं शकणार नाहीं ( कलम २६ पहा ). मालानुमानांतील, मृारंभीचा सिद्धांत व निगमन खेरीज करून बाकीचे सवे सिद्धांत महत्प्रतिज्ञा असतात. माला N ܟ=. नुमानांत फत अगदीं अखेरची प्रतिज्ञा निषेधरूप असू शकेल; कारण याशिवाय दुसरी एकादी प्रतिज्ञा निषेधरूप अमूल्यास, ती ज्या अनुमानवाक्याची महत्तूंज्ञा होईल त्या अनुमानवाक्याचें निगमनही निषेधरूप होईल?