पान:तर्कशास्त्र.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. % tw\9 स्याद्वादाविषयी नियम असे आहेत कीं, ( १) पूर्वगामी सिद्धांत-मग तो संविभागी असो किंवा नसो-जर खरा असेल, तर आनुषंगिक सिद्धांत खरा ह्मटलाच पाहिजे; (१) आनुषंगिक सिद्धांत-तो संविभागी असो किंवा नसो-जर खोटा ठरेल, तर पूर्वगामी सिद्धांतही खोटा ह्मटला पाहिजे. १०. (१), कांहीं ठिकाणी, एक पूर्वगामी व अनेक आनुषंगिक सिद्धांत मिळून पहिली प्रतिज्ञा (ह्या ० अर्थातू महत्प्रतिज्ञा ) झालेली असते. अशा ठिकाणीं निगमन निषेधरूप असतें. जर्से, जर अ=ब, तर क=ड व ई=फ; परंतु क ड बरोबर नाहीं, किंवा ई फ बरोबर नाहीं; .'. अ ब बरोबर नाहीं, हें लक्षांत ठेविलें पाहिजे की, वरील उदाहरणांत अ=ब ही अल्पप्रतिज्ञा धरून, क=ड व ई=फ असें विधिरूप निगमन काढितां येईल, परंतु हास्याद्वाद होणार नाहीं, कारण स्याद्वादाचें मुख्य लक्षण हें आहे की, त्यांतील अल्पप्रतिज्ञा नेहमीं संविभागी असली पाहिजे. (मागील कलम पहा ). (२) कांहीं ठिकाणीं, अनेक पूर्वगामी व एक आनुषंगिक सिद्धांत मिळून महत्प्रतिज्ञा झालेली असते, व हाच आनुषंगिक सिद्धांत निगमनाचे ठिकाणीं असतो, हें अनुमान विधिरूप असतें, जर्से, जर अ=ब किंवा क=ड, तर इ=फं; परंतु अ=ब किंवा क=ड; , རྙི-fi