पान:तर्कशास्त्र.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसर, ? आनुषंगिक सिद्धांत खरा आहे. यावरून पूर्वगामी खरा अाह असें अनुमान करणें ह्मणजे अव्यातमध्यपद, किंवा । दोन्हीं प्रतिज्ञा निषेधरूप असणें, हा हेत्वाभास आहे. जर्से, अ. ज्याला क्षयरोग असेल तो मरेल, (क्षयरोग असणारा मरणारा आहे ); अ. हा मनुष्य मरेल; (हा मनुष्य मरणारा आहे); .’. अ. या मनुष्याला क्षयरोग आहे. या ठिकाणीं दोन्हीं प्रतिज्ञा विधिरूप असल्यामुळें दोहोंची 'मरणारा' ही विधेयपर्दे अव्याप्त आहेत. व हेंच मध्यपद आहे. ह्मणून हा अव्याप्तमध्यपद हेत्वाभास झाला. वरील विवेचनांवरून व उहाहरणांवरून एवढें सिद्ध झालें कीं, पदांच्या परस्पर संबंधापुरतें पाहिलें असतां, संकेतार्थी अनुमान व स्वार्थी अनुमान हीं दोन्हीं वस्तुतः अगदी एकच आहेत, व १३ व्या व १४ व्या कलमांत सांगितलेलीं तत्वें संकेतार्थी अनुमानालाही लागू पडतात. संविभागी अनुमान. ४६. यांतील एक प्रतिज्ञा संविभागी सिद्धांत असते व दुसरी शुद्ध स्वार्थी असते. प्रत्येक संविभागी सिद्धांतांत एका पर जातीच्या सर्व अपर जाती सांगितलेल्या असतात. व अपर जातींनीं पर जाति पूर्णपणें व्यापिली पाहिजे, व अपर जाती एकमेकांपासून अगदीं भिन्न पाहिजेत, हे जे तर्कसिद्ध विभागाचे दोन नियम ते या सिद्धांतांत पाळावे लागतात. या सिद्धांतांत दोन किंवा