पान:तर्कशास्त्र.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १३५९ विंधिरूप एकदेशी सिद्धांत आहेत. अ व आ यांचा अर्थ एकूच समजा. क्याचप्रमाणें इ व ई या दोहोंचाही अथ एकच आह असा समजाव. ३३. स्थित्यंतर. स्थित्यंतर म्हणजे एका हेतुस्थितींतील अनुमानाला दुस-या हेतुस्थितीचें रूप देणें. पहिल्या हेतुस्थितींतील अनुमानास इतर कोणत्याही हेतुस्थितीचें रूप देतां येतें. परंतु, दुस-या, तिस-या किंवा चवथ्या हेतुस्थितीतील अनुमानास पहिल्या हेतुस्थितीचें रूप देण्याची जी क्रिया तिलाच विशेषेकरून 'स्थित्यंतर करणें? ही संज्ञा आहे. चवदाव्या कलमांतील तत्व-जें पहिल्या. हेतुस्थितीस स्पष्टपणें लागू पडतें असें वर सांगितलें आहे तें-ज्यांत जातिवाचक पद आहे अशा सर्व प्रकारच्या अनुमानांचें नियामक तत्व आहे हैं दाखविर्ण, हा स्थित्यंतर करण्याचा मुख्य उद्देश आहे. परंतु त्यापासून दुसरें असेंही दाखविलें जार्त कीं, अनुमानक्रियच्चें स्वत:सिद्ध रूप कोणतेंही असो, किंवा त्या क्रियेचें स्वरूप व सत्यता दाखविण्याकरितां तर्कशास्रकारांनीं तिला कोणतेंही रूप देिलेलें असो, तरी ती क्रिया सर्व ठिकाणीं वस्तुत: व तत्वतः एकाच प्रकारची असते. ३४. स्थित्यंतर नेहमीं अव्यवहित अनुमानांच्या येोगानें व विशेषतः परिवतीच्या योगानें होत असतें; ह्मणजे एका किंवा अधिक सिद्धांतांतील पर्दे आपण फिरवून ठेवतें. कोणत्याही संधीचें स्थित्यंतर कसें करावें हैं दाखविण्याकरितां मागील कलमांतील सूत्र तयार केली आहेत. त्यांतील शइांच्या प्रारंभीचीं अक्षरें कु, चु, त, प्