पान:तर्कशास्त्र.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ तर्कशास्त्र. आहेत ? असें एखादा सुधारक जर प्रतिपादन करूं लागला तर हैं निगमन निघण्यास त्याची महत्प्रतिज्ञा अशी समजली पाहिजे कीं, ‘ जें जें अतक्र्य असेल तें तें खरें मानितां येत नाहीं ? (इ ). आतां या सिद्धांताची प्रतिक्रिया करण्याकरितां, वर सांगितल्याप्रमाणें आपणांस असें सिद्ध करून दाखवितां येईल कीं. ' कांहीं अतक्र्य गोष्टी ख-या मानिल्या पाहिजेत ' (ए), कारण हा सिद्धांत त्याच्या महत्प्रतिज्ञेचा विसंवादी आहे. ३०. यांतील विशेष नियम हे आहेत कीं, (१) अल्पप्रतिज्ञा विधिरूप असली पाहिजे, कारण, ती निषेधरूप असेल तुर् निगमून, निषेधुरूप होईल व त्यृर्तुल महत्पद व्यातांवांशष्ट होईल. परंतु तें पद महत्प्रतिज्ञेत व्यतिविशिष्ट असू शकणार नाही, कारण अल्पप्रतिज्ञा निषेधरूप असल्यावर महत्त्रतिज्ञा विधिरूप असली पाहिजे. या नियमार्ने अइइ, अइओ, व अऔाओ, हे तीन संधी वर्ज होतात. (२). निगमन एकदेशी असलें पाहिजे कारण, तें सर्वगत असल्यास अल्पपद व्यतिविशिष्ट होईल, परंतु तें पद विधिरूप अल्पप्रतिज्ञेचें विधेय असल्यामुळे तेथें व्यातिविशिष्ट नाहीं. या नियमानें अअअ, इअइ हे दोन संधी वर्ज होतातु. या हेतुस्थितीचें नियामक तत्व हें आहे की, ' ज्या दोन पदांमध्यें एका समान भागाचा समावेश झालेला असतो त्या दोन पदांचें अंशतः ऐक्य असतें. (हें वरील आकृतीवरून स्पष्ट होईल. ) व जर एका पेदांत ज्या भागाचा समावेश होतो त्याचा दुस-या पदांत समावेश होत नसेल