पान:तर्कशास्त्र.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा, १३१ २९. तिसरी हेतुस्थिति. म.वि.अ. शरीर व आत्मा यांचा संबंध खरा मानिला पाहिजे. म. उ.अ. शरीर व आत्मा यांचा संबंध अतक्ये आहे. उ.वि. ए. कांहीं अतक्र्य गोष्टी खन्या मानिल्या पाहिजेत, ज्या अनुमानांतील मध्यपद व्यक्तिवाचक असेल तीं अनुमानें या हेतुस्थितींत पडतात, कारण जेथें विधेयपद जातिवाचक असतें तेथें उद्देश्यपद साधारणपणें व्यक्तिवाचकच असतें. म्हणून जेथें एखादं विवक्षित उदाहरण दुाखून आपलें झाणणें सिद्ध कराव्याचें असेल तेथें या हेतुस्थितीचा उपयोग करावा. तसेंच जेव्हां प्रतिपक्षी एखादा सर्वगत सिद्धांत स्थापू इच्छित असेल तेव्हां त्या सिद्धांतास एखादा अपवाद दाखवून तो सिद्धांत खेोडून टाकण्यास या हेतुस्थितीचा उत्तम उंपयोग होईल. उदाहरणार्थ, ' तुमच्या वेदांतील कांहीं कल्पना ख-या मानितां येत नाहीत, कारण त्या, मनुष्यास अतक्र्य