पान:तर्कशास्त्र.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

থ হ২৪ तर्कशास्त्र. २४, हेतुस्थिति. अंत्यपदांच्या संबंधानें मध्यपदाच्या ( मध्यपदाला संस्कृतांत हेतु ह्मणतात ) ज्या निरनिराळ्या रचना होतात त्यांना 'हेतुस्थिति ' असें म्हणतात. ज्या अर्थी मध्यपद हें अनुमानाचें मुख्य बंधन आहे, त्या अर्थी हेतुस्थितीव्रून अनुमानांचे विभाग पाडिले असतां पुष्कळ सोय होणार आहे. पहिल्या हेतुस्थितींत, मध्यपद महत्प्रतिज्ञेचें उद्देश्य व अल्पप्रतिज्ञेचें विधेय असतें. दुसच्या हेतुस्थितीत, तें दोन्हीं प्रतिज्ञांचें विधेय असतें. तिस-या हेतुस्थितांत तें दोहींचें उद्देश्य असतें. चवथ्या हेतुस्थितोंत, तें महत्प्रतिज्ञेचें विधेय व अल्पप्रतिज्ञेचें उद्देश्य असतें. ‘वि ? हें अक्षर महत्पदाच्या ( निगमनांतील विधेयाच्या ) अर्थी आपण लिहूं. तसेंच *उ ' हें अल्पपदाच्या ( निगमनांतील उद्देश्याच्या ) अर्थी, व 'म ’ मध्यपदाच्या अर्थी लिहूं. उ. महत्प्रतिज्ञा. वि. 고) cE 2t HSY 승 ཉ 3. वि. - - - - - e{cqufast. - - - - - - - - * वरील कोष्टकांत उ. वि. उ. वि. हे चार खुट आहेत असें समजावें. व महत्प्रतिज्ञेच्या उ. खुटापासून एक दोरी निघून, ती अनुक्रमें वि वि. उ. उ. या चारी खंटांना वळसा घालून, शेवटी महत्प्रतिज्ञेच्या वि.