पान:तर्कशास्त्र.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. ११५ प्रकारच्या विधानांविषयीं समजावें. हँच तत्व * आरेिस्टाटलचा सिद्धांत ? या नांवानें प्रसिद्ध आहे. ज्या अनुमानांत जातिवाचक पद असेल त्या सर्व अनुमानांचें नियामक तत्व हेंच आहे असें समजावें. कारण पुढें असें आढळेल कीं, जातिवाचक पद असणा-या अनुमानांत नेहमीं एका संपूर्ण जातीविषयीं एक विधान केलेलें असतें, व त्या जातींतील एका अपर जातीविषयीं किंवा एका व्यक्तीविषयीं दुसरें एक विधान केलेलें असतें; अशा रीतीनें पहिल्या विधानाच्या संख्यागमांत दुसरें विधान आल्याकारणानें, या दोन विधानांच्या संयोगापासून निगमन सहजच निघतें. ( मागील ६ व्या कलमांतील उदाहरण पहा). १९. या ठिकाणीं, जात्यात्मक अनुमानांत (परंतु तुल्यबल अनुमानांत नव्हे ) आढळणारी कांहीं नवीन परिभाषा आहे, ती समञ्जून सांगितली पाहिजे. निगमनांतील उद्देश्यास * अल्पपद ? व विधेयास * महत्पद ? असें ह्मणतात. अशीं नांवें देण्याचें कारण हैंच आहे कीं, अल्पपदाचा ( निदान विधिरूप सिद्धांतांत, भाग २ कलम १४ पहा) संख्यागम सर्वांत लहान असतो, व महत्पदाचा संख्यागम सर्वात मोठा असतो. ज्या प्रतिज्ञत महत्पद असतें तोस ( महत्पदप्रतिज्ञा किंवा थोडक्यांत बोलावयाचें असल्यास ' पद' हीं अक्षरें गाळून ) महत्पतिज्ञा व तसेंच ज्या प्रतिज्ञेत अल्पपद असतें तीस अल्पमतिज्ञा अर्स ह्मणतात, मग अनुमानवाक्यांत कोणतीही प्रतिज्ञा प्रथम सांगितलेली असो. परंतु कांहीं तरी एक ठरीव नियम