पान:तर्कशास्त्र.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ኗ g 8 तर्कशास्त्र. कालिदासानें शाकुंतल रचिलें, ज्यानें शाकुंतल रचिलें तो सर्व संस्कृत कवींत श्रेष्ठ आहे; ' . कालिदास सर्व संस्कृत कवींत श्रेष्ठ आहे. ' याच सदराखालीं, अंकगणितांतील व भूमितींतील बहुतेक अनुमानें घालतां येतील. जर्से, अ=दा 可=布 म्हणून अ=क या प्रकारच्या सर्व अनुमानांमध्यें, प्रत्येक सिद्धांतांत उद्देश्याच्या ठिकाणीं विधेयपद ठेविलें व विधेयाच्या ठिकाणीं उद्देश्यपद ठेविलें, तरी प्रत्येक अनुमान खरें व शास्त्रशुद्धच होईल. जर्से ज्यार्ने शाकुंतल राचिलें तो कालिदास होता, संस्कृतकविश्रेष्ठाने शाकुंतल रचिलें, *, संस्कृत कावश्रेष्ठ कालिदास हा होता. या व अशा त-हेच्या सिद्धांतांतील पर्दे व्यक्तिवाचक किंवा गुणवाचक असतात म्हणून हे सर्व तुल्यबल सिद्धांत (उ ) होत. येथपर्यंतचा भाग सोपा झाला. यापुढील भाग अधिक कठिण आहे. कारण त्यामध्यें जातिवाचक पर्दे, संख्यागम, अल्पपद, महत्पद, संधी व हेतुस्थिति इतके प्रकार येतात. या नवीन भागाचा आतां विचार करूं. १४. दुसरें नियामक तत्व: एका जातीविषयीं जें विधान केले असेल, तें त्या जातींतील सर्व व्यक्तीविषयींही करेतां येईल, हें विधिरूप व निषेधरूप अशा दोन्हीं