पान:तर्कशास्त्र.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग्या तिसरा. ፳፻ቑ मागल्या नियमाप्रमाणें दुसरी प्रतिज्ञा विधिरूप अंसलचि पाहिजे. हाणजे, एका प्रतिज्ञेत आपण असें प्रतिपादन करितों कीं, एका अंत्यपदाशीं मध्यपदार्च ऐक्य नाहीं, व दुसरींत असें करितों कीं, दुस-या अंत्यपदाशीं मध्यपदाचें ऐक्य आहे. असें असल्यावर दोन्हीं अंत्यपदांचा परस्परांशीं भेद झालाच पाहिजे. १२ ( ५ ) निषेधरूप निगमन सिद्ध करणे. झाल्यास, दोहॉपैकीं एक प्रतिज्ञा निषेधरूप असली याहिजे. अंत्यपदांपैकीं एका पदाचा मध्यपदाशीं कोणताही संबंध नाहीं असें दर्शविल्याशिवाय, अंत्यपदांमध्यें परस्परसंबंध कोणताही नाहीं असें आपणांस प्रतिपादन करितां येणार नाहीं. १३ मनांमधील असें ठरीव तत्व कोणतें आहे कीं ज्याच्या आधारावर ही सर्व अनुमानक्रिया घडते, याविघयीं विचार करूं लागल्यास, पहिलें नियामक तत्व हैं आढळेल कीं, ज्या दोन वस्तू तिस-या एकाच वस्तूशीं समान असतात त्या परस्परांशोंहीं समान असतात. व निषेधरूप अनुमानांत हें आढळेल कीं, ज्या दोन वस्तूपैकीं, एक तिसच्या एक वस्तूशीं समान असते, परंतु दुसरी त्याच तिस-या वस्तूशीं समान नसते, त्या परस्परांशीं समान नसतात ज्या अनुमानांतील लन्हीं पर्दे व्यक्तिवाचक किंवा गुणवाचक असतात, ती सर्व याच तत्वाच्या आधारावर होतात. जर्से,