पान:तर्कशास्त्र.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा ጻo❖ आहे की, संस्कृत पद्धतींत परामशाचे ( ह्मणजे व्याविशिष्टपक्षधर्मताज्ञानाचे ) योगानें अनुमिति कार्रतां येते. व या परामशांत महत्प्रतिज्ञा व अल्पप्रतिज्ञा या दोहोंचा समावेश होतो. दुसरा भेद हा आहे कीं, न्यायशास्त्रांत, अनुमानक्रिया निर्दोष असावी एतदर्थ कांहीं नियम सांगितलेले असतात एवढेच नव्हे, तर खेोट्या प्रतिज्ञांपासूनं आपण दूर राहावें अशा विषयींही त्यांत तजवीज केलेली असते. ती अशी कीं, महत्प्रतिज्ञा सत्य आहे हे सिद्ध करण्याकरितां अनुमानवाक्यांत एक उदाहरण घेतलेलें असतें. ] - ६. कांहीं लोक असे ह्मणतील कीं, एकुच विधानापासून आह्माला अनुमान काढतां येतें. तें अगदीं खरें आहे, व अशा अनुमानांना ' अव्यहित अनुमानें ' ह्मणतात हैं आह्मीं मागें सांगितलेंच आहे; व ' अव्यहित अनुमाना ' विषयीं लिहितांना, कोणत्याही एका विधाना पासून कांहीं अनुमानें ताबडतोब ज्या रीतीनीं काढिता येतात त्या रीतीही मार्गे सांगितल्याच आहेत. परंतु अशा रीतीनीं काढलेल्या अनुमानांची संख्या फारच लहान आहे. परस्पराशीं कांहीं एक विशिष्ट संबंध असलेलीं अशी दोन दोन विधानें जर आपण घेतलीं तर त्यापासून आपणांस अनेक नवीं विधानें करितां येतील. व अशीं विधानें करण्याची जी पद्धत तिलाच 'व्यवहित अनुमान' किंवा 'शुद्ध अनुमान' असें ह्मणतात. असेंही पुष्कळ वेळां घडतें कीं, या प्रकारचें अनुमान कार्रतांना, प्रमेयाच्या ठिकाणीं एकच विधान साँगेतलेलें असतें. परंतु सर्व क्रिया सूक्ष्म रीतीनें तपासठ η ο