पान:तर्कशास्त्र.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १०७ ६. वरील अनुमानांतील तीन्हीं तुलना स्पष्ट करण्याकरितां, त्या तीन सिद्धांतांच्या रूपानें आपण मांडू:- ब्राह्मण जानवें घालतात, गोपाळा ब्राह्मण आहे, '. गोपाळा जानवें घालतो. अनुमानाचें असें पृथकरण करून तें याप्रमाणें मांडलें ह्मणजे त्यालाच अनुमानवाक्य असें ह्मणतात. ही पद्धति अरिस्टाटलर्ने प्रथुम शोधून काढली असें म्हणतात.वरील अनुमुानवाक्य वतुलाच्या रूपान मांडण असल्यास त अस माड़ाव, [न्यायशास्त्रांतील अनुमानाच्या विवेचनावरून असें निःसंशय रीतीनें सिद्ध होतें कीं, इतर राष्ट्रांप्रमाणें, आम्हीं आपलें तर्कशास्त्र ग्रीक लोकांपासून घेतलें नाहीं. संस्कृत न्यायशास्त्रांत अनुमानाचे दोन प्रकार केले आहेत; स्वार्थानुमान व परार्थानुमान. आपल्याला ज्ञान व्हावें या हेतूनें केलेलें तें स्वार्थ. परंतु जव्हां आपण स्वत: ज्ञान करून घेऊन, दुस-याला बोध करून देण्याकरितां पंचावयवी वाक्याचा प्रयोग करतीं तेव्हां तें परार्थ, परार्थीनुमानाच्या