पान:तर्कशास्त्र.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १०५ प्रसंग येती तो त्याजवर येऊं नये. या नियमासारखेच दुसरें उदाहरण म्हटलें म्हणजे अंकगणितांतील नियम होत, कारण यांच्यायोगानें अडाणी लोकांची खडे मांडून किंवा बोटें घालून गणित करण्याची जी पद्धत तींतील कंटाळवाणेपणा व अनिश्चय हीं टळतात. नाहींतर ही मंडळी मारे हिकडून तिकडून खटपट करून एकदांचे उत्तर तर आणते, परंतु पहावें तो प्रत्येकाचें उत्तर निरनिराळे, व प्रत्येक म्हणत असतो कीं आपलेंच उत्तर खरें; पण त्यांपैकी कोणास असा जर प्रश्न केला कीं, 'होय ! तुमचेंच उत्तर खरें असेल! पण इतरांची चूक कोठं होत आहे हें तुझीं स्पष्टपणें दाखवू शकाल काय ?,' तर त्याला उत्तर-अंहंः ! रामाय तस्मै नमः ! तर्कशास्त्र न पढलेल्यांचाही हाच प्रकार होत असती. यावरून सर्वास हैं कबूल केलें पाहिजे कीं, अशा प्रकारच्या नियमांनीं युक्त जै तर्कशास्त्र त्याला ' घटपटादि खटपट ती ' असें केवळ निंदापर नांव देण्याऐवजीं, 'व्यर्थ बडबडीची खटपट वांचविणारें शास्त्र ? असें म्हटल्यास तेंच अधिक योग्य दिसेल. कारण हें शास्त्र शिकल्यानें विवाद करणा-यांचें नेहमीं ऐक्यच होईल असें जरी नाहीं, तरी वादांतील मुख्य प्रश्न काय आहे तो दोन्हीं पक्षांस चटकनू समजेल, व त्यायोर्ग बुद्धीचा व कालाचा अपव्यय होणार नाहीं. ४. आतांपर्यंत विधान करतानां आपण दोन ज्ञात वस्तूंची ताबडतोब परस्परांशीं तुलना करीत होतीं, व त्यांमध्यें ऐक्य आहे किं नाहीं हैं ठरवीत होतों. परंतु अशीही कांहीं विधानें आहेत (यानांच अनुमानें म्हणतात)