पान:तर्कशास्त्र.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. ২০ই तर्कशास्त्र शिकण्याची काय जरूर आहे ?' असा तर्कशास्त्राविरुद्ध जो एक आक्षेप लोक घेतात तो किती पोकळ आहे हैं ही यावरून उघड होईल. यासारखीच दुसरीं उदाहरणें जीं वर सांगितलीं आहत त्यांवरून असें दिसेल की, असा आक्षेप इतर पुष्कळ ठिकाणी आणितां येईल, व तुर्थ त्याची अयुक्तता अगर्दी स्पष्ट दिसेल. व एवढ्याच आक्षेपावरून, हें शास्त्र शिकल्यानें आपल्या विचारशक्तींत यत्किचितही सुधारणा होणार नाहीं किंवा निदान या शास्त्राचा अभ्यास हा एक उदात्त व मनोरंजक व्यवसाय होणार नाही, असें आपणांस कधीही म्हणतां येणार नाहीं. २. पुढ़ें आम्हीं असें दाखविणार आहों कीं, अनुमानाचा विषय आध्यात्मिक, आधिभैतिक, नैतिक, मानसिक, गणितसंबंधीं, राजकीय, सामाजिक किंवा दुसरा कोणताही असला तरी अनुमान क्रियेंतील मूलतत्वें एकच असतात. तर्कशास्त्राचें स्वरूप व हेतु हीं सर्वांच्या पूर्णपणें ध्यानांत न येण्याचें एक मुख्य कारण हें आहे की, सर्व ठिकाणीं अनुमानू कुरण्याची पद्धत एकाच प्रकृारची आहे हें पुष्कळांना पूर्णपणें समजत नाही, किंवा ते येोग्य रीतीनें ध्यानांत धरीत नाहींत. हुबेहुब याच त-हेचें दुसरें एक उदाहरण देऊं म्हणजे त्यावरून ही चूक कशी होते हैं स्पष्ट होईल व ती दुरुस्त होईल आपणां सर्वास है ठाऊक आहे कीं गणितशास्त्रांत, ज्या वस्तूंची संख्या आपल्यापुढें मांडलेली असते त्या वस्तूंच्या स्वरूपाप्रमाणें गणितक्रिया बदलत नसते. जसें, संख्या झाडांची असो कोसांची असो किंवा मणांची असो, त्या संख्येची बेरीज