पान:तर्कशास्त्र.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. - S - अनुमान ( व्यवहित ), १. ज्या ज्या वेळीं आपण 'अनुमान' करितों, ह्मणजे सत्य प्रमाणांचा उपयोग करितों-मग तें प्रतिपक्षाचें खंडन करण्याकरितां असो, दुस-यास ज्ञान होण्याकरितां असो, किंवा कोणत्याही विषयासंबंधानें स्वतःचे समाधान करण्याकरितां असो, व आपण हातांत घेतलेला विषय कोणताही असेो-त्या त्या वेळीं आपल्या मनामध्यें एक विवक्षित क्रिया घडत असते, व ती योग्य रीतीनें घडली असल्यास, प्रत्येक वेळीं एकाच प्रकारची असते. आतां हैं खरें आहे कीं, आपल्या मनांत अशी एक क्रिया घडत असते एवढी तरी महिती प्रत्येकांस आहे असें आपणांस ह्मणतां यणार नाही; मग ज्या नियमांस अनुसरून ही क्रिया घडत असते ते नियम ठाऊक असणें तर लांबच राहिलें ! ज्या ज्या क्रियांच्या संबंधानें पुढें एक व्यवस्थित शास्त्र बनविलें गेलें अहि, त्या सवीची कथा हीच असते व दुसरी असणें । शक्यही नाहींः प्रयोग उपपत्तिशिवाय असू शकेल एवढेंच नव्हे, तर उपपत्ति स्थापन होण्याच्या पूर्वी प्रयोग सुरू असलाच पाहिजे. व्याकरणपद्धति शेधून काढण्यापूर्वी भाषा ही असलीच पाहिजे, तसेंच गाय्नुशास्त्र तयार होण्यापूर्वी गाणीं, पर्दे ही असलच हजेत. तकेशास्त्राचा ज्यांना गंधही नाही, ते देखील सुरख रीतने व बिन चूक अनुमान करूं शकतात, मग