पान:तर्कशास्त्र.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. ८६

  • प्रत्येक मनुष्य मत्र्य आहे ? हा सिद्धांत जर खरा असेल तर ' कांहीं मनुष्यें मत्र्य आहेत ? हा सिद्धांत ओघानेंच खरा ठर्तो ह्मणजे ए सिद्धांत हा अ सिद्धांताचा केवळ एक प्रयोगायू आहे. ह्मणूनच या दोन सिद्धांतांमधील संबंधास विपर्यय असें नांव दिलें आहे. याचप्रमाणें इ व ओ सिद्धांतांसंबंधानेंही समजावे. जसें, ' कोणीही मनुष्य · निप्पाप नाहीं ? हा सिद्धांत जर खरा असेल तर त्यापासून ' कांहीं मनुष्यें निप्पाप नाहीत ? हा सिद्धांत सहजच खरा ठरेल. आतां, ए सिद्धांत जर खेोटा ठरेल तर त्यावरून आपणास अ सिद्धांत खेोटा आहे असें ह्मणतां येईल. तैसेंच, ओी सिद्धांत जर खेोटा ठरेल तर त्यावरून आपणास इ सिद्धांत खेोटा आहे असें ह्मणतां येईल. जसें, * कांहीं मनुष्यांनां चार पाय असतात ? हा सिद्धांत जर खेोटा ठरेल तर ' सर्व मनुष्यांनां चार पाय असतात ? हा सिद्धांत खेोटा आहे असें आपणूस सहजच ह्मणतां येईल. व ' कांहीं मनुष्यांना पोट नसतें ? हा सिद्धांत जर खेोटा ठरेल तर ' कोणत्याही मनुष्याला पोट नसतें ? हा सिद्धांतही खेोटा ह्मटलाच पाहिजे. हें उघड आहे की, एकदेशी सिद्धांत खरा आहे म्हणून त्यावरून सर्वगत सिद्धांतही खरा आहे असें आपणांस ह्मणतां येणार नाहीं. ह्मणजे ए सिद्धांतावरून अ सिद्धांत ठरवितां येणार नाहीं, व ओ सिद्धांतावरून इ. सिद्धांत ठरवितां येणार नाहीं. जसें, ' कांहीं पुरुष आंधळे असतात ? हा सिद्धांत खरा ठरला तरी त्यावरून ' सर्व पुरुष आंधळे असतात ? असें झणणें वेडेपणाचें होईल! परंतु हीच चूक व्यवहारामध्यें