पान:तर्कशास्त्र.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

‘රදි तर्कशास्त्र, आपणास विचार करावयाचा आहे तीं एका 'मध्यपदा? च्या साहाय्यानें काढिलेलीं असतात, ह्मणून त्यांस व्यवहित अनुमानें अशी संज्ञा आहे. अव्यहित अनुमानें हीं दिलेल्या सिद्धांतांतील दोन पदांच्या परस्पर संबंधावरून व प्रत्येक पदाच्या गुणागमावरून, संख्यागमावरून व एकंदर अर्थावरून काढिलेलीं असतात. २४. परिवते -ही पहिली पद्धति होय. या ठिकाणीं फक्त पर्दे फिरविलेलीं असतात, ह्मणजे उद्देश्यपद विधेयाच्या ठिकाणीं व विधेयपद उद्देश्याच्या ठिकाणीं आणिलेलें असते. दिलेल्या सिद्धांतांत परिवर्तित सिद्धांत जर अंतर्गत असेल तरच हा दुसरा सिद्धांत खरा ठरेल. व हें साधण्याकरितां मुख्य नियम असा आहे की, दिलेल्या सिद्धांतांत जें पद व्यातिविशिष्ट नसेल तें परिवर्तित सिद्धांतांत कधींही व्यातिविशिष्ट समजतां कामा नये. हैं दोन तीन प्रकारांनी साधतां येईल. (१) शुद्ध परिवर्त. याठिकाणीं पदांमध्यें * परिमाणा ? चा कांहींही बदल न कारतां तीं फिरविलेलीं असतात. जेर्थ दोन्हीं पदें व्यातिविशिष्ट असतात अशा इ सिद्धांतांत याप्रमाणें करीत येईल. तसेंच जेथें एकही पद व्यातिविशिष्ट नसतें अशा ए सिद्धांतांतही याप्रमाणें करितां येईल. जसें, أمير मूळ सिद्धांत. परिवर्तित सिद्धांत, इ. कोणताही मनुष्य | कोणताही निर्देष प्राणी निर्दोष नाहीं. मनुष्य नाहीं. ए. कांहीं मनुष्यें उदार | कांहीं उदार प्राणी मनुष्ये असतात. असतात.