पान:तर्कशास्त्र.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

<ど。 तर्कशास्त्र. पहिला भेद हा कीं, दोन्हीं विधरूप सर्वगत सिद्धांत असूनही उ सिद्धांतांतील विधेयपद नेहमीं ब्यातिविशष्ट असतें, व अ सिद्धांतांत तें व्यातिविशिष्ट नसतें. दुसुरा भेद हा कीं, उ सिद्भुतांतील दोन्हीं पदें गुणवाचक किवा व्यात्तवाचक याqका असतात, परतु अ सिद्धांतांत निदान विधेयपद तरी जातिवाचक असतेंच. तिसरा भेद हा कीं, उ सिद्धांतांत वाक्यार्थाचा यत्किंचितही बदल न करतां दोन्हीं पदें जशींच्या तशींच फिरवून ठेवतां येतात, पण अ सिद्धांतांत तसें करतां येत नाही. सिद्धांतांचें संयोग. संकेतार्थी सिद्धांत व संविभागी सिद्धांत. १८. निरनिराळ्या सिद्धांतांचा परस्परांशीं कोणकोणत्या प्रकारचा संबंध असू शकेल या विषयीं आतां आपणास विचार करणें आहे. यापैकीं कांहीं संबंध इतके पोकळ आहेत कीं ते तार्किक विचाराच्या नियमाखाली मुळीच आणतां येत नाहीत. जसें, 'हें फूल गोंडस व सुवासिक आहे,' या वाक्यांत ' फूल गोंडस आहे,’ व 'फूल सुवासिक आहे? हीं देोन वाक्यें एकत्र केली आहेत, परंतु एका फुलाविषयीं दोहोंत एक एक निरनिराळी प्रतिज्ञा केली आहे याखेरीज दोहोंमध्यें परस्पर सबंध असा कोणताही नाहीं. तसेच 'ताप भथंकर होता. परंतु रोगी जगला? या वाक्यांत एकमेकाविरुद्ध अशा दोन प्रतिज्ञा आपण कारतों, परंतु तर्कशास्रांत समावेश Fa होण्याजोगी कोणतीही बुद्धीची क्रिया येथें घडत नाही.