पान:तरंग अंतरंग.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'तो' दिवस एखादा दिवस कसा उगवेल, हे अगोदर कळलं असतं तर किती बरं झालं असतं! एखाद्या दिवशी संकटं डोंगरासारखी पुढं उभी ठाकतात. माझ्या कैरो दौऱ्यात असंच काहीसं झालं. श्री. चंद्रशेखर यांच्याशी झालेल्या केवळ पत्रव्यवहारामुळे मी अलेक्झांड्रियाची पेपर मिलची व्हिजिट आवरून कैरोला परतलो आणि भारतीय राजदूताची ठरलेली भेट घेण्यासाठी बरोबर १० वाजता त्यांच्या कचेरीत हजर झालो. आतून बोलावल्याची वर्दी आल्यावर ओव्हरकोट बाहेरच अडकवून मी आत दाखल झालो. The great pyramids of Giza., on the outskirts of Cairo बघायचा कार्यक्रम आखला असल्यामुळे २० मिनिटांची चर्चा संपवून बाहेर येऊन गडबडीने ओव्हरकोट घालून बाहेर पडलो. रस्त्याच्या कोपऱ्यापर्यंत आलो असेन नसेन एवढ्यात बस कुठून पकडायची हे पाहायला नकाशा शोधण्यासाठी ओव्हरकोटच्या खिशात हात घातला आणि भराभर सगळेच खिसे चाचपडून झाले. बाहेर प्रचंड थंडी असूनही मला दरदरून घाम सुटला. कारण माझे पाऊचच सापडत नव्हते. मग जवळजवळ पळतच परत दूतावास गाठलं, पण काहीच उपयोग झाला नाही. पुन्हा बाहेर येऊन सगळा रस्ता पाहून झाला; पण मला हवे असलेले पाऊच सापडले नाही. डोळ्यांपुढं अंधार दाटला. काहीच न सुचून समोरच्या उद्यानातल्या लाकडी बाकड्यावर मटकन् बसलो. संकटाचा आवाका आता चांगलाच माझ्या लक्षात आला होता. मी माझा पासपोर्ट, विमानाची तिकिटे, अमेरिकन एक्सप्रेस बँकेचे चेकबुक, एअरपोर्टवरील मी सामान ठेवलेल्या लॉकरूमची रिसिट व जवळजवळ २०० डॉलर्स एवढं सारं त्या पाऊचमधून गमावून बसलो होतो. सुन्न झालो. एका क्षणात मी भिकारी आणि कुठल्याही देशाचा नागरिक नसलेला 'गुन्हेगार' झालो होतो. अशीच ५-१० मिनिटं भ्रमिष्टावस्थेत गेली. घाम पुसला. बाकावरच 'पद्मासन' घातलं. मन एकाग्र केलं. आई अंबाबाईची प्रार्थना केली आणि कुठल्या तरी अजाणत्या उत्साहाने उठलो. आणि पुन्हा राजदूतांना भेटलो व माझी अडचण सांगितली. ते एवढंच म्हणाले, “तुमच्याकडे फोटो असेल तर पोलीस चौकीतून पासपोर्ट हरवल्याची तक्रार नोंदल्याची प्रत आणल्यावर मी डुप्लिकेट पासपोर्ट देऊ शकेन; पैशाची मात्र कसलीही मदत करू शकणार नाही. पण इथून तुम्ही कुणालाही फोन करू शकता." मी लगेच अलेक्झांड्रिया पेपर मिलचे जी. एम. श्री. चंद्रशेखर यांना फोन करून माझ्यावर ओढवलेली परिस्थिती सांगितली. त्यांनी लगेच त्यांच्या कैरोमधील ऑफिसचा नंबर देऊन तिथून ५०० पाऊंड घेण्यास सांगितले. त्यांचे आभार मानले; पण 'इतर काही जमले नाही तर पैसे घेईन,' असे कबूल केले. दारावर आलेल्या खऱ्याखुऱ्या गरजवंताला १० रुपये द्यायला पण आपण धजावत नाही; आणि या परक्या देशात ९९ / तरंग अंतरंग