पान:तरंग अंतरंग.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनमोराचे 'आत्मभान' दोन-तीन वर्षांपूर्वी सुप्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवीचे पुनरागमन असलेला 'इंग्लिश विंग्लिश' हा चित्रपट खूप गाजला होता. चित्रपटाची गोष्ट तशी साधीच. चाळिशीतल्या मध्यमवर्गीय गृहिणीची व तिच्या परीने घरगुती लाडू करण्याचा उद्योग चालवणाऱ्या छोट्या उद्योजिकेची. पण तिचं घरात 'असणं' घरातल्या सगळ्यांच्या इतकं अंगवळणी पडलेलं की, मुलं आणि नवरा या सगळ्यांच्या नजरेत नुसते तिचे छोटे-छोटे दोष कुसळासारखे खुपणारे. तिचे गुण त्यांनी पूर्णतः गृहीत धरलेले. त्या चित्रपटाच्या शेवटी एक प्रसंग आहे.... तिने केलेले लाडू सगळ्यांना देत तिचा नवरा मोठ्या फुशारकीने म्हणतो, "माझी बायको लाडू इतके छान करते ना की, केवळ लाडू करण्यासाठीच तिचा जन्म आहे, असं वाटावं.‘“ त्याच्याजवळ बसलेल्या श्रीदेवीचा चेहरा खर्रकन उतरतो. तिची भाची तिला नंतर म्हणते, "केवळ लाडू वळण्यासाठीच तुझा जन्म नाही झालेला मावशी. ' हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता; विशेषतः मध्यमवयीन स्त्रियांमध्ये तो फारच गाजला.. तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच मी एका लंच पार्टीला गेले होते. बरोबर सगळ्या बायकाच होत्या. काही गृहिणी, काही नोकरदार, तर काही स्वतःचा छोटा का होईना पण काहीतरी उद्योग करणाऱ्या. सगळ्याच जणी बऱ्यापैकी आर्थिक सुस्थितीतल्या... लेखिका मंगला गोडबोलेंच्या शब्दात सांगायचं तर पिठा-मिठाचे प्रश्न न पडलेल्या. काहींची मुलं कॉलेजमध्ये जाणारी, तर काहींची शाळेत. सगळ्या जणींनी तो चित्रपट बघितला होता आणि सगळ्याच जणींची प्रतिक्रिया जवळजवळ सारखीच होती, "आम्ही घरासाठी, संसारासाठी, मुलांसाठी इतकं करतो; पण आम्हाला इतकं गृहीत का धरलं जातं ?" एकजण म्हणाली, “वीस वर्षं गेली सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात; तरीही मला कशाचं वाईट वाटतंय, ते कुणाला समजतही नाही..... आणि माझ्या आयुष्यात, त्या सिनेमात आल्यासारखा थोडाच कुणी देखणा, समजूतदार फ्रेंच माणूस येणार आहे जो मला 'आत्मभान' मिळवून द्यायला मदत करेल. [1 मी हसले. म्हटलं, “अगं, इतकं जर तुला कळतंय, तर मग तुला आत्मभान मिळवून द्यायला दुसरं कुणीतरी पाहिजेच कशाला ? तुझं तूच मिळव ना आत्मभान. ' "स्वतःच मिळवायचं असते. म्हणून तर त्याला 'आत्मभान' म्हणतात ना ? तुला तुझ्या आयुष्यात कुणी देखणा, समजूतदार फ्रेंच माणूस यायला हवाय ना; मग तूच ९५ / तरंग अंतरंग