पान:तरंग अंतरंग.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मैतर दोस्ती किती घट्ट असावी याच काही मोजमाप नाही. म्हणजे दोस्तीची डेन्सिटी अमुक इतकी आहे, असं काही परिमाण नाही. लोखंडाची डेन्सिटी 1cm x 1cm x 1cm ठोकळ्याची जवळ जवळ आठ ग्राम असते. तर तेवढ्याच आकाराच्या ओस्मियमची (OSMIUM 2 ) २२ ग्राम. म्हणजे साधारण एक चमचभर OSMIUM घेतलं तर २२ ग्राम वजन भरेल. थोडक्यात घट्ट दोस्तीला OSMIUM 2 दोस्ती म्हणता येईल तर पातळ दोस्तीला हवेसारखी किंवा पाण्यासारखी पातळ दोस्ती म्हणता येईल. कारण हवेची डेन्सिटी फक्त ०.२९ ग्रॅम / क्यूबिक सेंटीमीटर, तर पाण्याची १ ग्रॅम / क्यूबिक सेंटीमीटर. घट्ट दोस्त मंडळीना मस्त गप्पा मारताना धरबंध ठेवण्याची मुळी गरजच नसते. परवाचंच बघा, माझ्या एका जिगरी मित्राचा दवाखान्यातून बऱ्याच दिवसानंतर फोन आला. म्हणाला, 'अपघातामुळं माझ्या गुडघ्याला प्रचंड मार बसला आहे आणि माझे ऑपरेशन झाले आहे.' यावर त्याला मी एवढेच विचारले, 'मेंदूला धक्का नाही ना लागला ?' ते ऐकून माझा मित्र इतक्या मोठ्यानं हसला, की नर्सबाई बहुदा पळत येऊन त्याच्यावर ओरडल्याचं मला फोनवर स्पष्ट ऐकू आलं. 'अहो, एवढ्या मोठ्यानं हसू नका.' पण तरी तो मला म्हणाला, 'अरे गाढवा, मला काही मदत हवी का, बघायला केव्हा येऊ विचारशील का माझ्या मेंदूवर घसरशील.' मी त्याला अगदी तिसरी- चौथीतली त्याची मीच केलेल्या टवाळीची याद दिली. महेकर सर वर्गात आल्यावर आमचा हाच दोस्त उभा राहिला आणि म्हणाला, 'सर, आमच्या बाकाखाली कुणीतरी मोठा दगड टाकलाय!' सर वाकून बघायला लागले. मी शेजारीच बसलो होतो. उभं राहून म्हणालो, 'नाही सर यानं माझं न ऐकता मघाशी जोरजोरात डोकं हलवलं, तेव्हाच हा दगड खाली पडला.' सारा वर्ग त्यावेळी रुमाट हसला होता. आत्ता तो त्या आठवणीने पण नर्सच्या भीतीनं फक्त खदखदून हसला. म्हणाला, 'दुखणं निम्मं कमी झालं बघ.' ही दोस्ती OSMIUM दोस्ती !! जन्मभर घट्ट राहिलेली अशी दोस्ती म्हणजे खरी म्हातारपणीची इस्टेट ! अशाच एका दोस्ताला बघता बघता अल्झायमयरचा त्रास सुरू झाला. विसरायला होतं म्हणता म्हणता अस्तित्वच गमावून बसला. इतरांशी विक्षिप्त वागताहेत म्हणून कानाडोळा करता करता बिचाऱ्याला खोलीत कोंडून ठेवायची पाळी आली. अशावेळी दोन-चार घट्ट दोस्त मिळून सान्निध्यात राहून, त्याला आठवणारा भूतकाळ थोडा अधिक स्मरणीय करता येऊ शकेल का, या विचारानं गलबलायला झालं. पण यात वैद्यकशास्त्र गुंतले असल्याने असहाय्य वाटतंय. वैद्यकशास्त्राला अल्झायमर ८५ / तरंग अंतरंग