पान:तरंग अंतरंग.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रद्धांजली 'श्रद्धांजली' ही फक्त माणसाच्या निधनासाठीच असायला हवी का? वास्तविक माणसाबरोबरच इतरही प्राणी, पक्षी कुटुंबाचाच हिस्सा बनून प्रेम, जिव्हाळा मिळवून अनेक वर्षे एकत्र राहतात. या जिव्हाळ्यामुळेच घरातील सारीच म्हातारी कोतारी, तरुण अगदी रांगणारी बाळं सुध्दा या सहचराच्या अचानक जाण्याने काही दिवस तरी उद्ध्वस्त होऊन जातात. साऱ्यांनाच काही सुचेनासं होतं. वास्तविक, पक्ष्यांचा 'ब्रेन' तो केवढा! मेंदूच्या फक्त आकाराचाच विचार केला तर हे कुटुंबाचे सभासदच झालेले पाळीव पक्षी, प्राणी माणसाच्या मायेला केवढा प्रतिसाद देतात! तुमच्या-आमच्यावर प्रेम करतात. मुलांनी कान, शेपटी ओढली तरी मायाच करतात. हे स्तिमित करणारे आहे. हे बघून काही वेळा असे वाटते की, माणसाला परमेश्वराने अनेक सॉफ्टवेअर बसवून एवढा मोठा मेंदू देऊनही अहंभाव, द्वेष, स्वतःच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पना कशासाठी दिल्या असाव्यात. स्वतःला जरुरीपेक्षा जास्त ठेवूनही, दुसऱ्याला काही देऊ शकण्याच्या ताकदीचा उपयोग माणसाने गर्विष्ठपणा, तुसडेपणा, दांभिकपणा, खोटा दुराभिमान आणि आपल्या श्रीमंतीचे दरिद्री प्रदर्शन करण्यासाठी माणूस काय काय करतो. अर्थातच, यालाही अपवाद असतातच. निर्मोही संतांची निर्मिती जगात म्हणूनच झाली असावी. आमच्याकडेच लहानाचे मोठे झालेले एक कुत्र्याचे पिल्लू पुढे भावाकडे जुनोनी येथील सरकारी फार्मवर पाठवले. बाराशे एकर जमिनीवरील, चारशे गायी-गुरे असलेल्या जुनोनी येथील सरकारी फार्मवर ते वास्तव्याला होते. तिथल्या ऑफिसपासून मेनगेट बरेच लांब होते. तरी या कुत्र्याच्या बारीक नजरेतून घुसखोर सुटत नसे. प्रचंड वेगाने त्याच्यावर हल्ला होत असे. पण आम्ही घरातली कोणीही माणसे दारात पोचलो की, तितक्याच वेगाने येऊन अंगाखांद्यावर उड्या मारून तो आनंद व्यक्त करत असे. सामान खाली ठेवून अगोदर त्याला थोपटून प्रतिसाद द्यावा लागे, दुसरी त्याची कसलीही अपेक्षा नसे. एकदा माझे दुसरे भाऊ, वडील निवर्तल्याची बातमी जुनोनीच्या ज्येष्ठ भावास देण्यास गेले. आमच्यावर निरपेक्ष प्रेम करणारे ते श्वानबंधू मेन गेटवर माझे भाऊ आलेले पाहूनही नेहमीप्रमाणे ते पळत आले नाही. घरात पोचल्यावरही आपल्या पुढच्या दोन्ही पायांवर डोकं ठेवून करुण नजरेनं पाहत राहिलं. मुक्या प्राण्यात असलेल्या 'शुद्ध' प्रेमाची जाणीव या स्तरावर काम करत असते. ही संवेदना त्यांना कोठून येत असेल. प्रसंगाचं गांभिर्य, मृत्यूवार्तेचं सावट न बोलता त्याच्यापर्यंत कोणत्या कंपनांनी पोहोचवलं असेल, याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याच्या नेहमीच्या वागण्यातला अवखळपणा जाऊन तिथं गंभीरपणे प्रसंगाला सामोरं जाण्याची बुध्दी त्याला कशी आली असेल... मला उगीचच चितोडचे राणा प्रतापसिंग आणि त्यांचा मारवाडी ब्रीडचा तरंग अंतरंग / १२६