पान:तरंग अंतरंग.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुन्हा कुंडलिका एका अशाच जिवलग मित्राबद्दल आणि कुंडलिका या पूज्य नदीसंबंधातली एक आठवण लिहायची राहूनच गेली. माझा सख्खा शेजारी सोमनाचे हा अतिशय मस्त, सज्जन, हळुवार मनाचा इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा इंजिनिअर. कर्नाटकातून रोह्याला आलेला. जेवण झालं की, रात्री आम्ही तिघे चौघे न चुकता नदीपासून दूर काठावर, मस्त गार हवा खात बसत असू. मी व सोमनाचे मिळूनच बाहेर पडून इतरांना आवाज देत, गोळा करत निघत असू. सिगारेटीचा स्वाद घेणाऱ्यांना तर पर्वणीच ! सारे आमची वाटच पहात असायचे. आम्ही आवाज दिला की ते घरातून बाहेर पडत, त्यांच्याबरोबरच मागोमाग " निघाले बघा धूर काढायला,” असा 'मंजुळ ' टोमणा पण बाहेर पडे. आम्ही आपले मुर्दाडपणे गालातल्या गालात हसून दोन पावले जरा भरभर टाकत असू. 'त्या' दिवशी अमावस्या होती. गृहिणीची साद जरा प्रखरपणे प्रगट झाली. "अहो, आवसेचं तरी काय आहे की नाही या भुतांना. " शेवटची 'पदवी' अर्थातच आमच्यासाठी होती. त्यामुळं जरा जास्तच वेगानं आम्ही घोर अंधारात नदीकाठ गाठला. आरामात गप्पा सुरू झाल्या. अमावस्येमुळे अर्थातच भुतांच्याच गप्पा रंगल्या. मी व सोमनाचे मात्र भूत ही कल्पनाच निव्वळ थोतांड आहे, यावर ठाम होतो.. दूरवर एक चिता शांत जळत होती. निखाऱ्याचा लालबुंद उजेड चितेच्या आजूबाजूला पडलेला इतक्या दुरूनही आम्हाला साफ दिसत होता; बाकी सारा काळाकुट्ट अंधार. "भूत नाही ना, मग चितेतलं एक-एक जळकं लाकूड आणा बघू तुम्ही दोघे, " या बाबूच्या वाक्यानं मात्र एकदम सगळे चूप झाले. मी व सोमनाचेनं एकमेकांकडं पाहिलं आणि उभं • चितेकडे एक-एक पाऊल भयाण अंधारात चालू लागलो. बाकी सारेच "नका जाऊ," म्हणून ओरडले, विनवू लागले. बाबू तर घरी जायलाच निघाला; पण भुताच्या चर्चेमुळं एकटं अंधारात जायची त्याची छाती होत नव्हती. बघता-बघता आम्ही दोघे चितेजवळ पोचलो. जवळजवळ पूर्ण जळलेली चिता असली, तरी तिची धग दहा फुटांवरपण जाणवत होती. कल्पनेनं मृत व्यक्तीची आकृती आम्हाला दिसू लागली ....आणि क्षणात दोघांनीही एक-एक पेटतं लाकूड उचललं आणि माघारी फिरलो. शांतपणे, न बोलता; पण मनात भूत संचारल्यासारखं तरातरा चालू लागलो. बाबू भीतीनं कापत होता. काही केल्या ते लाकूड हातात घ्यायला तयार होईना. आम्ही पुलावरनं लाकडं पाण्यात टाकून परतलो. पहाटे चार वाजता कुणी तरी माझ्या खोलीचे दार ठोठावू लागलं. मी तर रात्रीचा प्रसंग विसरूनच गेलो होतो. दार उघडून बघतो, तर भयंकर, करुण चेहऱ्याचा सोमनाचे हातात एक कागद घेऊन उभा होता. कागद त्यानं वाचायला माझ्याकडं दिला. मी मटकन् खुर्चीवर बसलो. सोमनाचे ओक्साबोक्सी हुंदके देत रडत होता. वडील तरंग अंतरंग / १२४