पान:तरंग अंतरंग.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वामी आज बऱ्याच दिवसांनी स्वामींची आठवण झाली. हे स्वामी म्हणजे कोणी आध्यात्मिक स्वामी नव्हेत. तसं मी बुवा, स्वामी काहीतरी त्यांच्याकडून घेण्यासारखं असल्याशिवाय यांच्या फार जवळ जात नाही. मध्येच स्वामी म्हटल्यावर माझी पहिली चारधाम सफर आठवली. 'सफर' एवढ्यासाठीच म्हटलं की, यात्रा म्हटलं की उगीचच मानेला टोचणाऱ्या रुद्राक्षाच्या माळा गळ्यात पडतात. सतत १२ वर्षे ओळींनी चारधाम यात्रा करणाऱ्या परांजपे (बहुधा) बाईंनी, "मी अंघोळ करून उगीच फेरफटका मारायला जातोय," म्हटल्यावर, "तुम्ही माझ्याबरोबर चला,' अशी 'आज्ञा'च केली. इथं, यमुनोत्रीच्या पायथ्याशी पुण्यशील मौनी स्वामी असतात, त्यांचं दर्शन घ्या आणि मग कुठंही उंडारा.... आता मात्र माझ्या सगळ्यात मोठ्या भगिनींची आठवण येऊन, मी कुठल्याही स्वामीचे छत्र धरण्याच्या मनःस्थितीत नसतानाही, "बरं, " म्हटलं आणि दर्शनाच्या लांबच लांब रांगेत टिवल्याबावल्या करत उभा राहिलो. दर्शन म्हणजे रांगेतून समोरच्या छोट्या खोलीत दार उघडं ठेवून सतत पेटलेल्या धुनीसमोर बसलेल्या 'त्या' दिव्य मौनी स्वामींना नमस्कार करणे. एवढेच 'दर्शन' करायचे हे ऐकून मी मनोमन सुखावलो. बाईंनी दर्शन घेतलं. नंतर माझा नंबर होता. मी त्या स्वामींकडे पाहिलं आणि चेहऱ्यावर इतक्या दुरूनही दिसणाऱ्या 'त्या' तेजस्वी मूर्तीकडे पाहत क्षणभर रेंगाळलो. मागचा रांगेतला माणूस मला पुढे ढकलण्याच्या तयारीतच होता. तो दगडूशेठ गणपतीला बहुधा सायकलवरून जाता-जाता वाकून कूर्निसात करत असावा, असे मला उगीचच वाटून गेले. तेवढ्यात त्यानं मला आपल्या बंद मुठीचा 'प्रसाद' अलगद पाठीमागून पेकाटावर ठेवून दिला. मी फक्त आमची 'कोल्हापुरी' नजर त्याच्याकडे टाकताच त्याने पटकन् दोन्ही हात खिशात घालून, आपला काहीच संबंध नसल्यासारखं देवळाच्या शिखराकडं पाहत होता. त्याची मुंडी गच्च धरून माझ्याकडं वळवावी, असा दुष्ट विचार येता क्षणीच स्वामींनी माझ्याकडं पाहत हातानं जवळ येण्याचा इशारा केला. त्यांच्या भक्ताकडे टाकलेला 'कोल्हापुरी' कटाक्ष ओळखला की काय यानं असं वाटून मी थबकलो. एवढ्यात तर्जनी माझ्याकडे अगदी ठासून दोन-तीनदा दाखवून मीच तो 'पामर' ज्याच्या भेटीची त्या 'महामानवाला ओढ लागल्याचे मला जाणवून दिले. मी दाराशी नतमस्तक उभा राहिलो. आत येऊन तिथं असलेल्या बसकुटावर बसण्यासाठी स्वामींनी इशारा केला. आता नजरेत मात्र प्रेमळ वडिलांचा आग्रह होता. मी वाकून नमस्कार करून बसलो आणि माझ्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही. हे मौनी ऋषी एकदम माझ्याशी बोलू लागले ! ( मला उगीच रंभेनं विश्वामित्रांची मोडलेली तपश्चर्या आठवली.) हजारो वर्षांपासूनची बहुधा वशिष्ठ ऋषींच्या तपस्येची ही जागा. वशिष्ठ ऋषींचे नाव घेतल्याने उगीचच अंगावर शहारे आले. याचे एकमेव कारण म्हणजे माझं 'वशिष्ठ' गोत्र. डोळ्यांसमोर उगीचच समोर ११३ / तरंग अंतरंग