पान:तरंग अंतरंग.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चीनहून आल्याबरोबर मला सांगली संस्थानातील लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे, तेव्हा इथं जनावरांचा दवाखाना काढावा, असं नानांनी राजेसाहेबांना सुचवलं......आणि जनावरांचा दवाखाना आणि पागाधिकारी म्हणून नाना सांगली संस्थानच्या नोकरीत रुजू झाले. चार घोड्यांची बग्गी नानांच्या सेवेला मिळाली. बग्गीत बसलेले नाना, मागे दोन उभे शिपाई, असे पहिल्यांदा घरी आले, तेव्हा बक्काच्या डोळ्यांतून अश्रूंची धार लागली. अनवाणी शाळेत जाणारा आपला भाऊ आज बग्गीतून घरी आलेला पाहून तिला काय वाटलं असेल, याची कल्पनाच केलेली बरी. "रडायचे दिवस संपले आता बक्का, ' नाना म्हणाले. "1 दर आठ-पंधरा दिवसांनी एक पंचविशीतला तरुण आमच्याकडे यायचा. बरोबर एक मोठी तरटाची पिशवी असायची. नाना मला ती पिशवी भरून जोंधळे त्याला द्यायला लावायचे. असे का करताय हे नानांना विचारायची आमची हिंमत नसायची. तरी एकदा भीत भीत विचारलेच. यावर नाना म्हणाले, "मी होस्टेलवर असताना मे महिन्याच्या सुट्टीत एकटाच उरलो होतो. करायचं काय ? सांगलीला जायला पैसेच नव्हते. तेवढ्यात, सांगलीचे एक गृहस्थ मला भेटायला आले आणि मी पाणी आणायला पाठ वळवताच माझ्या भिंतीवर अडकवलेल्या शर्टच्या खिशात १० रुपये ठेवून थोड्या इकडच्या-तिकडच्या गोष्टी करून निघून गेले. ते गेल्यावर अर्थातच माझ्या सांगलीला जाण्याची तजवीज करायलाच ते आले होते, हे लक्षात आले." "मग मला सांग आज त्यांची परिस्थिती बरी नाही, म्हणून त्यांच्या मुलाला आपण जोंधळे देऊन काहीही मोठं काम करत नाही आहोत." कुठल्याही मदतीची कृतज्ञता आपण इतर मार्गाने व्यक्त करणे आपले नैतिक कर्तव्यच आहे, ही गोष्ट मी यातून शिकलो. नानांच्यासाठी १० रुपयांची किंमत किती प्रचंड होती, हे कळून त्या 'महान' पित्याच्या पायावर भरल्या डोळ्यांनी डोके ठेवून मनोमन नमस्कार करणे, यापलिकडे मी तरी काय करणार होतो ? १०९ / तरंग अंतरंग