पान:तरंग अंतरंग.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ठेवायला सांगून मी त्यांची तिकिटे घेऊन मघाच्या कॅसेट दिलेल्या रक्षकाला गाठले आणि त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावल्यावर अगदी थोडा वेळ उरलेला असताना त्या जोडप्याची तिकिटे 'कन्फर्म' करून त्याने माझ्या हाती दिली. आता मी 'त्या' रक्षकाला सलाम ठोकला. त्याने माझे दोन्ही हात हातात घेऊन प्रेमाने दाबले. त्या जोडप्याचा आनंद तर गगनात मावत नव्हता. मद्रासमधल्या बँकेत काम करणारी ती जोडी चक्क मला वाकून नमस्कार करती झाली. संकटाचं हे असं असतं. अशावेळी देवसुद्धा कुणाच्या ना कुणाच्या रुपात पाठीशी उभा राहातो. म्हणूनच देवाला सांगावं वाटतं की असे संकट शत्रूवर पण येऊ देऊ नको रेऽऽ देवा..! १०१ / तरंग अंतरंग