पान:ज्योतिर्विलास.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૮૨ ज्योतिर्विलास. अगदी वर हायद्रोजन आहे. आंत जावें तसतसे अनेक धातु बाष्परूपाने आहेत. पायथ्याशी या आवरणाची घनताही फार आहे. व सूर्याच्या तेजागोलापासून निघणाऱ्या किरणांचें तेथें निगिलन होते; म्हणजे कांहीं किरण तें गिळून टाकितें. हायद्रोजन, सोडिअम् , लोखंड, मग्निशिआ, बारियम् , तांबे, जस्त, क्यालशिअम् , कोमिअम् , निकेल, टिटानियम् , कोबाल्ट, मांगनीज ही तत्वें क्रकचावरणांत आहेत. सोनेही असेल असे संभवते. शिवाय पृथ्वीवर माहीत नाहीत असेही काही पदार्थ आहेत. हे सर्व अत्युष्ण बाष्परूपस्थितीत आहे. यांत धातु मुख्यतः खालच्या थरांत आहेत; आणि वायु मुख्यतः वर आहेत. शंगें क्रकचावरणावर पुष्कळ उंचीपर्यंत असतात, असे पूर्वी सांगितलेच आहे. प्रभामंडलाचा वर्णलेख सूर्यग्रहणांत मात्र चांगला निघतो. एरव्हीं स्पष्ट निघत नाही. परंतु प्रभामंडलापेक्षां शृंगें तेजस्वी आणि उष्ण असल्यामुळे त्यांचा वर्णलेख सूर्य प्रकाशलेला असतांही निघतो. ही शृंगे दोन प्रकारची आहेत. काही ढगांसारखी तरंगत असतात. परंतु कोणताही पदार्थ तोलून धरण्याजोगें वातावरण, शंगे असतात त्या प्रदेशी नाही. यामुळे प्रभामंडलाचे द्रव्य वर कसे राहते हैं सांगणे जसें कठिण आहे, तसेंच ह्या शृंगांविषयी आहे. त्यांत कांही शृंगें तर एकाच जागी फार वेळ स्थिर राहतात, यामुळे प्रभामंडल तोलून राहण्यासंबंधी पहिली दोन कारणे यास लागू पडत नाहीत. तिसरे मात्र लागू पडेल. दुसऱ्या प्रकारची शृंगे उद्गमनाने होतात. क्रकचावरणांतून मोठ्या झपाट्याने हायद्रोजन आणि मेंनिशिअम् बाहेर पडतात. त्यांचा वेग दर सेकंदास १५० मैलपर्यंत असतो. हे उद्गमन कितीएक घटिकांपर्यंत व कधीकधी कितीएक दिवसपर्यंत एकसारखें चाललेले असते. ह्या पदार्थांची वाफ हजारो मैल पसरते, आणि पुनः तेजोगोलावर येऊन पडते. सूर्यपृष्ठावर क्रकचावरणांत निरनिराळे व्यापार किती वेगाने चालले असतात हैं वर्णितां येणे कठिण. क्रकचावरण हा एक अग्निसमुद्र म्हटला तर पृथ्वीवरील अत्युष्ण अग्निगृहांपेक्षाही उष्ण आणि आतलांतिक महासागराच्या रुंदीहून खोल, असा तो समुद्र आहे. त्याची गति वादळाची गति म्हणावी, तर पृथ्वीवर वादकाचा वारा तासांत फार तर १०० मैल वहातो. क्रकचावरणांतल्या पदार्थात सेकंदांत इतका वेग आहे. सूर्याच्या वातावरणांतील वादळ इतकें जबर असते की, ते सिंहलद्वीपाच्या किनाऱ्यावरून निघाल्यापासून १५ सेकंदांतच मुंबई वगैरे बंदरांचा नाश करून कराचीस पोचेल; आणि वाटेंत नुसते झाडांमाडांचे धुडके धुडके उडवूनच राहणार नाही, तर सगळ्यांस अग्निरूप करील. ज्वालामुखीतून झपाट्याने बाहेर पडणारा आणि आसपासची शहरें गिळंकृत करणारा लाव्हा आपल्यास

  • जान्सन नामक मंच ज्योतिषी इ.स. १८६८ च्या सूर्यग्रहणांत हिंदुस्थानांत आला होता, तेव्हा त्याने प्रथम हा अनुभव घेतला. व इंग्लंदांत लॉकियर यानेही त्याच सुमारास हा शोध लाविला,