पान:ज्योतिर्विलास.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सविता. २५ पासून २६॥ पर्यंत दिवसांत सूर्याची अक्षप्रदक्षिणा होते. सूर्यबिंबाच्या पूर्वप्रांती एकादा डाग दिसू लागला तर सुमारे बारा तेरा दिवसांत तो पश्चिमप्रांती दिसतो. आणि पुन्हां १३।१४ दिवसांनी पूर्वेस दिसू लागतो. सूर्यावर हे डाग एकाद्या वर्षी फार दिसतात, एकाद्या वर्षी थोडेच दिसतात. वर्षात मुळीच डाग दिसला नाही असे कधीच होत नाही. हे डाग कमजास्त दिसण्याच्या काळांत कांहीं नियम दिसून येतो. एकदां डाग फार दिसले तर पुन्हा सुमारे ११ वर्षे ३ महिने इतक्या काळाने फार दिसतात. ह्या शतकांत इ० सन १८१०, २३, ३३, ४४, ५६,६७, ७८ ह्या वर्षी डाग फार थोडे दिसले. आणि इ. सन १८०४, १६, २९, ३७, ४८,६०, ७०, ७३ ह्या वर्षी फार दिसले. गेल्या (१८९२) वर्षी अप्रिल व मे महिन्यांच्या अखेरीस हे डाग पुष्कळ दिसले. हे डाग दिसण्याच्या काळाचे चक्र सवाअकरा वर्षांचंच आहे ह्याचे कारण काय ह्याचा अद्यापि निश्चयात्मक शोध लागला नाही. परंतु ह्याचे कारण बाह्योपाधि नव्हे, सूर्याच्या काही अंतःस्थितीमुळे नियमित काळाने हे डाग दिसतात असें प्रख्यात ज्योतिष्यांचे अनुमान आहे. सूर्याच्या डागांच्या कालचक्रास अनुसरून धान्यादिकांचे भाव कमजास्त होतात. डाग कमी असतात तेव्हां सूर्यकिरण पिकास अनुकूल असतात, असें हर्शल, मत होते. कै. वा० केरोपंतनाना ह्यांनी ह्याबद्दल पुष्कळ विचार केला होता. पावसाशी व दुष्काळाशी डागांचा संबंध आहे असे त्यांचे अनुमान होते. नकतेच निवर्तलेले मद्रास येथील वेधशाळेचे मुख्य अधिकारी पागसन ह्यांचे मत होते की, डागांप्रमाणे कर्नाटकाच्या पावसांत फरक पडतो. परंतु एकादे वर्षी पाऊस कमी पडला तरी तो हंगामशीर पडला असतां पिकांस फार उपयोगी पडतो असें होतें. यामुळे डागांवरून दुष्काळाबद्दल नियम फारसे बांधितां यावयाचे नाहीत. हर्शल, मत पुढील अनेक वर्षांच्या अनुभवावरून खरे ठरले नाही. आणि डागांशी पृथ्वीच्या उष्णतेचा व वातावरणाच्या स्थितीचा काही संबंध आहे की काय, असल्यास कसा आहे याबद्दल काही सिद्धांत अद्यापि ठरले नाहीत. आरोरा म्हणून चमत्कारिक प्रकाश उत्तरध्रुवाकडे दिसतो तो आणि विद्यच्छक्ति ह्यांचा व डागांचा संबंध आहे असे दिसून आले आहे. ज्या वर्षी डाग फार दिसतात त्या वर्षी आरारा हे औत्तरतेज फार दिसते. व विद्युयंत्रे आणि लोहचुंबक यांस उपाधि फार होतात. गेल्या वर्षी पुष्कळ डागांच्या वेळी ता. यंत्राच्या कामास अडथळा झाला, असें अनुभवास आले. नुसत्या डोळ्यांनी किंवा सामान्य दुर्बिणीतून सूर्य हा एक तेजोगोल दिसतो परंतु खग्रास-सूर्यग्रहणांच्या वेळी सामान्य दुर्बिणीने किंवा वर्णलेखकदुर्बिणीने या जोगोलाच्या भोवताली अनेक चमत्कार दिसतात. तेजोगोलाभोंवतीं प्रथम एक वरण आहे. हे तेजोमय आहे. ह्याचा पृष्ठभाग उंचसखल दिसतो. ताच्या दांत्यां सारखा दिसतो. करवताचे दांते एकसारखे असतात, तित वे असतात, तितकें निय