पान:ज्योतिर्विलास.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. पण म्हटले सूर्यबिवावर त्याच्या डागांची आ पाळी येईल. इतके हे अंतर आहे तरी आकाशांतील अंतर मोजण्याची ज्यातिष्यांची ही काठी आहे. हिमालय हा पृथ्वी मोजण्याचा मानदंड में कालिदासाने म्हटले आहे. एकाद्या भिंतीची लांबी मोजण्यास आपण एकादी हातभर लांब काठी घेतों किंवा फूट घेतो. हिमालया इतकी काठी म्हणजे किती विलक्षण अरसे मनांत येऊन आपण आश्चर्यचकित होतो. परंतु ९,२३,००००० मैलांच्या मानदंडा पुढे पृथ्वीवरच्या अति मोठ्या मानदंडाचा काय पाड! लावा नुसत्या डोळ्यांनी पाहिले तर सूर्यबिंब सर्व भागी एकसारखें तेजस्वी दिसते. परंतु दुर्विणींतून त्याजवर एक किंवा अनेक काळे ठिपके दिसतात. आणि बाकीचें बिंब एकाद्या स्वच्छ प्रवाही पदार्थांत तांदुळाचे दाणे किंवा बारीक कण तरंगत अ. सल्याप्रमाणे दिसते. हे कण अस्पष्ट दिसतात. कोठे कोठे मुळीच दिसत नाहींत. हे कण म्हटले तरी ह्यांचा वास्तविक विस्तार शेकडो मैल असतो. चित्रांक ७ यांत दुर्बिणीतून सूर्यबिंबावर दिसणारा एक डाग आहे. त्यावरून सूर्याच्या डागांचे स्वरूप समजेल. आणि त्याच्या भोवतालच्या आकृतीवरून सूर्यबिंब कसे कणमय दिसते हेही समजून येईल. सर्व डागांची आकृति सारखी नसते. आणि सूर्य आपल्या आंसाभोवती फिरतो यामुळे एकच डाग बिंबाच्या निरनिराळ्या भागी निरनिराळा दिसतो. मातीच्या गोळ्यावर चवली चिकटविली तर कशी दिसेल आणि तो गोळा फिरविल्यामुळे ती कडे कडे गेली असतां कशी दिसेल हैं मनांत आणिों असतां, डागाचे स्थान बदलल्यामुळे त्याची आकृति कशी बदलते हे समजेल. स्थानांतरामुळे होणाऱ्या फेरफाराशिवाय स्वतः डागाच्या आकारांतही फरक असतो. कांहीं डाग काही दिवस दिसन नाहीसे होतात. आणि कांही तर काही महिने दिसत असतात. एकादा डाग इतका मोठा असतो की तो नुसत्या डोळ्यांनीही दिसतो. वराहमिहिराने सूर्याचे वर्णन केले आहे ते वाचीत असतां त्यास व त्याच्या पूर्वीच्या ज्योतिष्यांस सर्यावरचे डाग दिसले असावे असें खात्रीने वाटते. सूर्यबिबाचे क्षेत्र किती आहे हे मनांत आणिलें म्हणजे हे डाग लहान दिसले तरी त्यांचे क्षेत किती मोठे असते हे लक्षात येईल. कांहीं डागांचे क्षेत्रफळ कोट्यवधि मैल असते. डागाचा मध्यभाग फार काळा दिसतो, त्यास छाया म्हणतात; आणि भावताली काळसर जागा दिसते, तिला छायाकल्प म्हणतात. दुर्बीण निघाल्यावर लागलाच म्हणजे इ० स० १६११ मध्ये प्रथम ह्या डागाचा शोध लागला. सूर्य आपल्या आंसाभोवती फिरतो हे डागांमुळेच समजले. हा अक्षप्रदक्षिणाकाल सूर्यबिंबावर सर्वभागी एकसारखा नाही. सूर्याच्या विषुववृतापक्षां ध्रुवाकडील प्रदेशास आंसाभोवती फिरण्यास जास्त काळ लागतो. आणि हा फरक निरनिराळ्या वेळी भिन्न असतो. असा भेद कां व कितपत पडतो याबइल अनेक अनुमाने आहेत, परंतु त्याबद्दल सिद्धांत अद्यापि ठरला नाही. सुमारे कुमारसंभव, १.१. २-नुसत्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहणे झाले तर भिगावर काजळ रून त्या मिर्गातून पहावें. नाही तर डोळे विघडतील. 3-बृहत्संहिता, अध्याय 3.