पान:ज्योतिर्विलास.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सविता. पूर्वी कोणास कल्पनाही नव्हती. हे अंतर काढण्यास निरनिराळ्या राष्ट्रांचे लक्षावघि रुपये आणि अनेक ज्योतिष्यांचे प्रयत्न खर्ची पडले आहेत. सूर्यबिंबाचे अधिक्रमण शुक्र अमुक दिवशी करणार असें भविष्य अगोदर करून त्यावर भरंवसा ठेवून तो दिवस आला की कोणी पृथ्वीच्या ह्या टोकास धांवतात, कोणी त्या टोंकास जातात. कोणी आमच्या देशांत येऊन जातात तरी आम्हांस त्याची दादही नसते. इ० स० १७६१ आणि १७६९ या वर्षी झालेल्या अधिक्रमणांवरून सूयांचे अंतर बरेंच सूक्ष्म समजलें. इ० स० १८७४ आणि १८८२ च्या अधिकमणांनी त्याहून सूक्ष्म ठरले. अधिक्रमणाशिवाय दुसन्याही दोनतीन रीतींनी हल्ली हे अंतर काढिले आहे. तरी अद्यापि त्यांत दोन तीन लक्ष मैलांची चुकी असण्याचा संभव आहे. जेथे कोटींनी गणना होणार तेथे दोन तीन लक्षांची चूक काही फार नाही. पुण्याहून मुंबईस चार तासांत पोचेल अशा स्पेशल ट्रेनीत बसून आपण सयोची यात्रा करण्यास निर्धू या. वाटेंत उतरण्यास स्टेशन नाही, म्हणून स्नानादिकांची तजवीज आपल्यास गाडीतच केली पाहिजे. ती केली म्हणजे गाडीला विसावा देण्याचे कारणच नाही. याप्रमाणे आपण दर अहोरात्रांत ७२० मैल प्रवास केला तर इ० स० १८९३ च्या आरंभी आपण निघाल्यास सूर्यदर्शन घेऊन परत येऊ तो इ० स० २५९५ साल येईल. सूर्य प्रसन्न होऊन आपल्यास इतकें दीर्घायण्य देईल, तरी मृत्युलोकी आमच्या वंशजांच्या २७ पिढ्या गुजरून पिढ्या तोडण्याची (POONA RELESEURES HERE चित्रांक ७-सर्यबितिलक.

  • पुढे बुध आणि शुक्र यांची वर्णनें पहा.