पान:ज्योतिर्विलास.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ ज्योतिर्विलास. लें तर काय होणार आहे असे आपल्यास वाटेल. परंतु ही वेसण सुटली तर पृथ्वी कोणीकडच्या कोणीकडे जाऊन तिची काय अवस्था होईल ह्याची कल्पनाही करवत नाही. रात्रीस सूर्य नसतो, तरी पृथ्वीच्या दुसऱ्या अंगास त्याचा व्यापार चाललाच असतो. त्याच्या पासून उष्णतेचा वर्षाव सतत सर्व दिशांनी होत असतो. पृथ्वीवरील चराचर वस्तूंचे रक्षण आणि पोषण होण्यास किती उष्णता लागत असेल याची कल्पना करा. परंतु सूर्यापासून निघणाऱ्या उष्णतेचा दोन अब्जावा मात्र हिस्सा कायतो पृथ्वीस मिळतो. यावरून सूर्यापासून किती उष्णता बाहेर पडते याचे अनुमान होईल. आपला हा महाराष्ट्रदेश आपल्यास किती मोठा वाटतो! कोणीकडे धारवाड आणि कोणीकडे खानदेश. कोणीकडे कोंकण आणि कोणीकडे सोलापूर. परंतु पृथ्वीशी लावून पाहिला असतां महाराष्ट्रदेश म्हणजे काहीच नाही. पृथ्वीचा एक लहानसा गोल केला असता त्यावर महाराष्ट्रदेश एक लहानसा ठिपका दिसेल, इतकी पृथ्वी मोठी आहे. जलद चालणाऱ्या आगीच्या बोटींत आपण बसलो आणि ती आगबोट रात्रंदिवस चालत असली, तरी मुंबईहून निघून पृथ्वीप्रदक्षिणा करून परत येण्यास षण्मास पाहिजेत. इतका या पृथ्वीचा घेर आहे. परंतु सूर्य इतका मोठा आहे की अशा १३ लक्ष पृथिव्या एकत्र कराव्या तेव्हां सूर्या एवढा गोळा होईल. दर तासास ३० मैल प्रमाणे रात्रंदिवस चालणाऱ्या आगगाडीला सूर्याभोंवती एक फेरा करून येण्यास सवानऊ वर्षे पाहिजेत. सूर्याच्या अंगी पृथ्वीला आकाशांत आपल्या भोवती फिरण्यास लावण्या जोगें बळ आले आहे ते केवळ त्याच्या आकारावर नाही. पुष्कळ धूमकेतु सूर्याहूनही आकाराने मोठे असतात. परंतु त्यांच्या अंगी आकर्षणशक्ति मुळीच नसते. सूर्याचे प्रकृतिद्रव्य पृथ्वी इतकें दाट नाहीं; सुमारे चवथाई विरल आहे. तरी त्याचे एकंदर द्रव्य मोजले तर पृथ्वीच्या ३॥ लक्ष पट वजन आहे. सूर्याभोवती फिरणाऱ्या सगळ्या ग्रहांचे घटकद्रव्य एकत्र केले तरी त्याच्या ७५० पट सूर्य आहे. म्हणूनच कोव्यवधि कोसांवरून तो त्यांस आपल्या भोवती प्रदक्षिणा घालण्यास लावितो. त्यांत कधीं चूक पडते, किंवा कोणी एकादा कधी थांबतो काय ? एकादें घड्याळ आपण आठ दिवसांची किल्ली देऊन ठेविलें तरी एकादे वेळी दुसयाच दिवशी बंद पडते. परंतु आमच्या सूर्याभोवती पृथ्वीहून लहान मोठे एकंदर ८ ग्रह फिरत आहेत. जे जवळ आहेत ते जलद फिरतात, दूर आहेत ते सावकाश फिरतात. ह्या सगळ्या घड्याळास परमेश्वराने किल्ली कधी दिली आणि ती किती दिवस पुरेल याचा बरोबर अजमासही कोणाला नाही. चंद्राहून पृथ्वी मोठी आहे, आणि तिच्याहून सूर्य फारच मोठा आहे. असे असून तो चंद्रा एवढाच दिसतो हे कसे, अशी शंका सहज येईल. तर हे सूर्याच्या अतिदूरत्वामुळे होते. पृथ्वीपासून सूर्य किती दूर आहे ह्याविषयी १५० वर्षां.