पान:ज्योतिर्विलास.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सविता. सविता. अधिकाधिक लागली आहे त्यात देतो सातर काय चंद्राविषयी विचार करीत असतां त्यास प्रेरणा करणारा सविता सहज मनांत येतो. ज्योतिषां रविरंशुमान " सर्व ज्योतींमध्ये भास्वान् रवि [ तो ] मी " __गीता १०.३१ या भगवद्वाक्याप्रमाणे आमच्या वैदिकधर्मी लोकांच्या मात्र दृष्टीने तो परमेश्वराची विभूति आहे असें नाहीं; तर आजपर्यंत जगांत सूर्यदेवतेची आराधना करणारी अनेक राष्ट्रे झाली. आणि शास्त्रीय शोध जसजसे वाढत आहेत तसतसा सूर्याचा प्रभाव अधिकाधिकच दिसून येऊन सूर्याच्या ठायीं परमेश्वराचे विभूतिमत्व अधिकाधिक प्रत्ययास येऊ लागले आहे. पृथ्वीवर सजीव म्हणून जे जे आहे त्यास सूर्याचा आश्रय आहे. ग्रहमालेचा अधिप मोठ्या कृपेनें जो प्रकाश आणि उष्णता देतो त्यावर त्याचे अस्तित्व अवलंबून आहे. सूर्य एकादे दिवशी प्रकाशण्यास विसरला तर काय अवस्था होईल ! हजारो जीव नाश पावतील, व लक्षावधि प्राणी विपत्तींत पडतील. सूर्याने चारपांच दिवस विश्रांति घेतली, तर सगळ्या प्राण्यांस अक्षय्यविश्रांति घेण्याचीच पाळी येईल. सूर्याने आपले बारा डोळे उघडिले किंवा सहस्र नेत्रांनी तो प्रकाशू लागला, तरीही वरच्यापेक्षां भयंकरच परिणाम होईल. उन्हाळ्यामध्ये अति ताप होऊ लागला म्हणजे केव्हां एकदा पाऊस पडेल असे आपल्यास होते. मेघ आपल्यास शांत करितात, जीवन देतात, इतकेंच नाही, तर जीवनोपयोगी पदार्थ पिकवितात. परंतु हे मेघ उत्पन्न होतात सूर्यापासूनच, हे आपण लक्षांत आणीत नाही. उन्हाळ्यास आपण त्रासतों, तशी थंडी फार पडली तर तीही आपल्यास नकोशी होते. परंतु उन्हाळा, पावसाळा, हिंवाळा, असे निरनिराळे ऋतु होतात म्हणून आपला सर्व व्यापार चालतो. आणि हे ऋतु करणारा सूर्यच होय. प्रकाश आणि उष्णता ह्यांच्या योगानें “ सूर्य हा स्थावराचा आणि जंगमाचा आत्मा आहे," अशी पूज्यबुद्धि आपल्या मनांत उद्भवते, त्याप्रमाणे सूर्य आपल्या विलक्षण प्रभावाने आपल्या भूलोकाला अधांत्री आकाशांत ओढून धरून आपल्या भोवती फिरण्यास लावितो, हेही आपण लक्षांत आणिले पाहिजे. वीतभर रुंद दिसणारे एवढेसें बिंब परंतु ते आपल्या या पृथ्वीच्याहून शेकडो पट मोठ्या गोलांसही पृथ्वीच्या हजारो पट अंतरावरून आपल्या भोवती फिरविते. वेसण घालून बैलास धरावें, तसें अदृश्य वेसणीने सूर्य पृथ्वीला धरितो. ते त्याने न धरि तैत्तिरीय संहिता, १.४.४३.