पान:ज्योतिर्विलास.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रजनीवल्लभ. कार आहे! तो आपल्या कधीच मनात येत नाही. परंतु हा गुण नसता तर दिवसासही आपल्यास घरांत दिवे लावावे लागते, अथवा उघड्या जागी उन्हांत रहावे लागते. सूर्यचंद्रांभोवती कधी कधी चित्रविचित्र रंगांचें मंडल दिसते. ते लहान असले म्हणजे त्यास खळे म्हणतात, मोठे असले म्हणजे तळे म्हणतात. संस्कृत भाषेत ह्यास परिवेष किंवा परिधि म्हणतात. गुरु, व्याध इत्यादि तेजस्वी ग्रह किंवा तारा ह्यांभोवतीही कधी कधी असे परिवेष दिसतात. परंतु ते लहान असतात. त्यांचा व्यास चार पांच अंशांहून जास्त नसतो. चंद्राभोवतीही असे लहान परिवेष कधी कधी दिसतात. व कधी कधी सूर्याभोवतीही पडतात, परंतु त्याच्या तेजस्वितेमुळे ते फारसे दिसत नाहीत. कधी कधी चंद्रसूर्याभोवती १२,२२॥, ३०, ३८, ४१, ४५, ४६, इतके अंश व्यासाचा परिवेष पडतो; आणि कधी तर ९० अंश व्यासाचा पडतो; म्हणजे तो खस्वस्तिकापासून क्षितिजापर्यंत पसरलेला असतो. कधी एकाबाहेर एक असे दोन समकेंद्र परिवष दिसतात. कदाचित् तीनही दिसतात. त्यांतील आंतल्याचा व्यास सुमारे २ पासून ४ अंशपर्यंत असतो. त्याच्या दुप्पट दुसऱ्याचा असतो. आणि बाहेरच्याचा तिप्पट असतो. परिवेषाचे रंग इंद्रधनुष्याच्या रंगांपेक्षां फिके असतात, व त्यांचा क्रमही निराळा असतो. आंतल्या अंगास बहुधा तांबडा रंग असतो. आणि बाहेरून फिकट निळा किंवा फिकट तांबडा असतो. सर्व परिवेषांचे रंग सर्वकाळ एकाच क्रमाने असतात असे नाही. तांबडा, पिवळा, पांढरा, निळा, जांभळा, हिरवा इत्यादि रंग निरनिराळ्या परिवेषांत निरनिराळ्या क्रमाने असतात. व एक रंग संपून दुसरा कोठे लागतो हे स्पष्ट समजत नाही. वातावरणांत उच्च प्रदेशी बर्फाचे किंवा गारांचे सूक्ष्म परशु तरंगत असतात. व आकर्षण आणि वायूचा प्रतिबंध ह्यांच्या योगाने ते निरनिराळ्या दिशांनी खाली येत असतात. कधी कधी त्यांचा इतर हिमकणांशी संयोग होतो. ह्यांतून प्रकाशकिरण येतांना वक्रीभवन पावतात, यामुळे परिवेष उत्पन्न होतो. कधी कधी साधारण मेघांच्या उंचीवरून धुक्याच्या अणूंतून किंवा दाट ढगांतील पाण्याच्या प्रकाशकिरण येतांना अपभवन पावून परिवेष बनतात. इंद्रधनुष्य, पाण्याच्या थेंबांतन किरणांचे वक्रीभवन व परावतेन झाल्यामुळे पडतेंः परिवेष बहधा बफतिन किरणांचें वक्रीभवन होऊन पडतात. आपल्यासही परिवेष उत्पन्न करितां येतो. थंड हवेत वाफ पुष्कळ पसरलेली असतां तीत दिवा धरावा, म्हणजे त्याच्या भोवती परिवेष दिसेल. खिडकी आ केंद्र म्हणजे वर्तुळाचा मध्यबिंदु. सम म्हणजे समान, म्हणजे एकच आहे केंद्र ज्यांचे 2-अप्रकाशित पदार्थाच्या कडेवरून जातांना प्रकाशाचे किरण आपला सरळ मार्ग न अप्रकाशित पदार्थाच्या छायेत जातात, त्यास अपभवन म्हणतात.