पान:ज्योतिर्विलास.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ ज्योतिर्विलास. की उत्पन्न होण्यास त्याचा व्यास दरसाल सुमारे २२० फूट म्हणजे शतकांत सुमारे ४ मैल कमी झाला म्हणजे पुरे आहे. याप्रमाणे पाहिले असतां मागे केव्हां तरी सूर्याचा विस्तार वरुणापर्यंत असला पाहिजे. व यावरून सूर्य हा तेजोमेघरूपाने होता व त्यापासून ग्रहगोल उत्पन्न झाले या मताची संभवनीयता दिसते. सूर्याचा मूळचा विस्तार अति मोठा मानिला तरी त्यास वरील नियमानें सांप्रतचा आकार प्राप्त होण्यास फार तर १८० लक्ष वर्षे लागली असतील असें निघते. आकुंचनमताप्रमाणे वायुरूपगोलाच्या आकुंचनास मर्यादा आहे. काही कालाने सूर्य द्रवरूप होईल. व तेव्हां आकुंचन बंद होईल. व तेव्हांपासून त्याच्या उष्णतेच्या संचयांत भर न पडतां ती कमी होऊं लागेल. पृथ्वीवरील प्राण्यादिकांचे पोषण होण्याजोगी उष्णता सूर्यापासून फार तर आणखी १ कोटि वर्षे बाहेर पडेल. अरीभवन कमी होईल तसतसे कार्वानापासून उत्पन्न झालेले संयुक्त वायु सूर्याभोवती जमू लागतील. शेवटी ते अतिशय जमतील तेव्हां किरणनिगिलन फार होऊं लागून सूर्य रक्तासारखा लाल दिसूं लागेल. व शेवटीं अप्रकाशित होईल. त्याजवर पृथ्वीप्रमाणे कवच बनेल. व त्यापासून इतर गोलांस उष्णता मिळेनाशी होईल. कांहीं तारा अशा झाल्या आहेत; आपला चंद्र तर कधीच अगदी थंड झाला असावा. पृथ्वीही प्रथम वायुरूप होती. तिचें सूर्याप्रमाणे रूपांतर होऊन पुढे तिजवर कवच बनले असावें. सूर्यमालेतले ग्रह मागे सांगितल्याप्रमाणे एकदमच बनले असावे. परंतु त्यांतले लहान आहेत ते अगोदर थंड होतील, मोठ्यांस जास्त काळ लागेल असें दिसते. गुरु, शनि व त्याच्या पलीकडचे ग्रह यांजवर अजून कवच उत्पन्न झाले नसावें. कवच बनल्यावर उष्णता बाहेर पडण्याचे मान एकदम फार कमी होतें. पृथ्वीच्या कवचांत जसजसे खोल जावें तसतशी उष्णता वाढत जाते. थोड्याच मैलांखाली ती इतकी असेल की आंतले सर्व पदार्थ वितुळलेले असतील. तथापि तेथील उष्णता कवचांतून उष्णतेच्या वाहकताधर्माप्रमाणे फार थोडीच पृष्ठभागी येते. सूर्याची उष्णता नसेल तर केवळ आंतल्या उष्णतेने प्राण्यांचे पोषण होणे कठिण.. तेजोमेघमताप्रमाणे ग्रह आणि तारा मूळच्या तेजोमेघरूपी होत्या व त्यांचे द्रव्य किंवा अशनिपरमाणु प्रथम आकाशांत सर्वत्र पसरलेले होते असें संभवते. परंतु तेजोमेघांचे आकार नियमित नाहीत. जोडतारांच्या कक्षा पाहिजे त्या दिशांत आहेत यामुळे तेजोमेघांपासून आपल्या सूर्यमालेप्रमाणे नियमित व व्यवस्थित माला उत्पन्न होण्याची अडचण दिसते. शिवाय सूर्याभोवती उत्पन्न झालेल्या वलयाचा ग्रह कसा बनेल हे समाधानकारकरीतीने समजत नाही. याप्रमाणे तेजोमेघमतावर आक्षेप आहेत. सूर्य आकुंचित झाला, किंवा तेजोमेघांपासून तारा बनल्या, असें प्रत्यक्ष दिसून येईपर्यंत याविषयी खात्री होणार नाही. आकुंचनाने सूर्यामध्ये नवीन उष्णता उत्पन्न होते हैं मत तेजोमेघमतास अनुकल आहे, परंतु त्यावरही आक्षेप आहेत. आकुंचनाने उत्पन्न झालेली उष्णता सर्व सूर्यगोलांत पसरली पाहिजे. वाहकताधर्माप्रमाणे ती पृष्ठभागी येईल तेव्हां