पान:ज्योतिर्विलास.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૨૮૮ ज्योतिर्विलास. विश्व. आतां आपण विश्वाचा विस्तार, त्याची संस्था आणि उत्पत्ति, स्थिति व लय ह्यांचा यथाशक्ति विचार करूं. हा विचार कल्पनातरंगांबरोबर वाहत जाऊन करावयाचा नाही; तर वेधांवरून अनुभवास आलेले वास्तवार्थ आणि सांप्रत निर्विवाद ठरलेले भौतिकशास्त्राचे सिद्धांत यांस अनुसरून करावयाचा.. - विश्व अनंत आहे ही कल्पना फार प्राचीन काळापासून आहे. परंतु त्या अनंतत्वाविषयी वास्तविक ज्ञान ३ हजार वर्षांपूर्वी अगदी संकुचित होते. ज्याने आपल्या गांवाखेरीज दुसरा गांव पाहिला नाही अशा मुलाला लहानपणी कोणी सांगितले की, पृथ्वी फार मोठी आहे तरी त्याला त्या विस्ताराची कल्पना जितकी होईल त्यापेक्षा त्याने दहा पांच गांव पाहिल्यावर जास्त होईल. शेपन्नास कोस प्रवास केल्यावर तो विस्तार त्याचे मनांत अधिक ठसेल, आणि मोठेपणी एकादा देश पाहिल्यावर तर त्याची कल्पना खरी त्याच्या मनांत येईल. आतां ही तरी कल्पनाच होय. प्रत्यक्षज्ञान नव्हे. तरी आपण पाहिलेल्या देशाच्या अमुक पट पृथ्वी आहे असे समजले असतां तुलनेने पृथ्वीच्या विस्ताराचें ज्ञान वास्तविक होईल. याप्रमाणेच विश्वविस्ताराची गोष्ट आहे. चंद्रसूर्याच्या अंतराचें ज्ञान कांहींच नव्हते, आणि ते व सर्व तारा सारख्याच उंचीवर आहेत अशी समजूत होती, तेव्हां विश्वविस्ताराची कल्पना ती किती असणार ? सूर्यादिकांपेक्षा नक्षत्रे अधिक अंतरावर आहेत एवढे समजले तरी कल्पना फारशी वाढली असें नाहीं. सूर्यमालेतील ग्रहांच्या गतिस्थितीचे ज्ञान आमच्या देशांतील व ग्रीस देशांतील लोकांस झाले, तेव्हां विश्वविस्ताराची कल्पना पुष्कळ वाढली. परंतु त्या वेळी चंद्राचे अंतर बरोबर समजले होते, आणि ग्रहांची अंतरें सापेक्ष समजली होती, तरी ग्रहांच्या वास्तविक अंतराचें ज्ञान नव्हते. मग तारांच्या अंतरांचे कोठचे? आमच्या ज्योतिषशास्त्रांत पृथ्वीपासून सूर्याचे अंतर सुमारे ६९०००० योजने आहे आणि ह्या योजना, मान ५ मैल आहे. म्हणजे सूर्याचे अंतर सुमारे ३४॥ लक्ष मैल झाले. आणि तारांचे अंतर ह्याच्या ६० पट मानिले आहे. ग्रहांच्या महत्त्वाविषयीं तर तेव्हां कांहींच कल्पना नव्हती. दिग्देशकाल या त्रिप्रश्नांचा विचार आमच्या ज्योतिषांत आहे. यांपैकी कालाच्या अनंतत्वाची कल्पना आमच्या सर्व ग्रंथांत पुष्कळ विस्तृत आहे. तारा आपल्या सूर्यासारख्या स्वयंप्रकाश आहेत व सूर्यमालेच्या बाहेर फार दूर आहेत असें कोपर्निकसाने दाखविले तेव्हांपासून ज्योतिष्यांचे लक्ष्य विश्वसंस्थेच्या विचाराकडे लागले. तरी कोपर्निकसासही तारांच्या अंतरांची कल्पना न. व्हती. आपला सूर्य हा विश्वाचा मध्य आहे व तारा त्यापासून सारख्या अंतरावर आहेत असे त्याचे मत होते. आकाशगंगा जी दिसते त्या वस्तुतः तारा आहेत असें गॅलिलियोनें दुर्बिणीच्या साहाय्याने दाखविले; व आपला सूर्य हा तारांपैकी एक आहे तो त्या सर्वांचा मध्य नव्हे, असे केप्लरने दाखविले; तेव्हांपासून विश्वसं.