पान:ज्योतिर्विलास.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. तकी उष्णता उत्पन्न होईल की तिने अति कठिण खडकही वितळतील. पांच चार सेकंद गेले नाहीत तोंच तो पृथ्वीवर आदळेल. तो तर चूर्ण होऊन वितळून जाईलच, परंतु पृथ्वीच्या पृष्ठावरच्या सर्व पदार्थाची वाफ होऊन पृथ्वीचे कसें रूपांतर होईल याची कल्पनाही करवत नाही. परंतु अशा युद्धाचा संभव अति थोडा आहे.. क्रांतितेजः-आकाश स्वच्छ असतां सूर्य मावळल्यावर पश्चिमेस व सूर्योदयापूर्वी पूर्वेस अस्पष्ट तेजाचा लोट दिसतो. तो सूर्याच्या दोन्ही बाजूंस क्रांतिवृत्तांत पसरलेला असतो. त्यास क्रांतितेज म्हणतात. ते कधी कधी अर्ध्या आकाशापयंत पसरलेले दिसते. ते सूर्याजवळ अधिक तेजस्वी असते. त्याचे स्वरूप अजून समजले नाही. पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये पृथ्वीच्या कक्षेच्या किंचित् बाहेरपयेत अगण्य अशनींचा समूह असावा, आणि त्याजवर सूर्याचा प्रकाश पडून परावर्तन पावल्यामुळे हे तेज उत्पन्न होत असावें. ज्या पदार्थामुळे हे तेज उत्पन्न होते त्यामुळेच बहुधा बुधाच्या उच्चगतीत फरक पडत असेल. MKHED CRILLERY GENERO NATIVE सार्वजानेकाला खेड, (गु.) (POUNA)