पान:ज्योतिर्विलास.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धूमकेतुः १७९ दृश्य असते. यावरून दुर्बिणकेतु हे ज्यांत कारबॉन आहे अशा काही मिश्रणा वायरूपाचे बनलेले आहेत असें एक मत आहे. परंत तसे मानण्यास काहा चणी आहेत. ते घन आणि वायरूपी अशा द्रव्याच्या मिश्रणाचे बनलला असे असू शकेल. सारांश सांप्रत याबद्दल निश्चयाने काही सांगता येत नाही. मोठ्या धमकेतूंच्या तारेचा व्यास शेकडो मैल असतो. ती तारा हा प्रमाणे एक घन पदार्थ असतो किंवा दुर्बिणकेत ज्या द्रव्याचे असतात त ठिकाणी दाट जमून ती बनलेली असते, अथवा अनेक अशनि एके ठिका जमून ती झालेली असते हैं निश्चयाने सांगता येत नाही. परंतु सूर्याच्या I ज्याची वाफ होते अशा द्रव्याची ती असते यांत संशय नाही. तिच्या भावत कावर एक वाफेची आवरणे असतात. मोठ्या केतूचे पुच्छ हे त्यास जडलला अवयव नसतो हे निःसंशय आहे. पाणी कढत असतां वाफेचा लोट चालला सतो त्याप्रमाणे धूमकेतूचे पुच्छ हे त्याचा मुख्य भाग जी तारा तीतून सूयाच्या ष्णतेने निघणाऱ्या वाफेचा लोट होय. ते नेहमी सूर्याच्या विरुद्ध बाजूस क सते याबद्दल अनेक मते आहेत. केतूची तारा अशनींची बनलेली असत... नीचे प्रकृत्यंश विरल असून त्यांच्यामध्ये वाय असतो; तो सूर्याच्या उष्णतनबार निघतो; सूर्याच्या उलट बाजूस त्याच्या प्रकृत्यंशांचे किंचित् घनीभवन हाऊन विरल असें पुच्छ बनतें; असें एक मत आहे. परंतु त्याबद्दल काही सिखात द्यापि ठरला नाही. सर्याच्या उष्णतेने धमकेतच्या अग्रभागाची नेहमी वाफ होत असत या त्याचा आकार उत्तरोत्तर कमी होत असला पाहिजे हे उघड आहे. हाला मकेतच्या पुच्छाची प्राचीन वर्णने आहेत त्यावरून पहातां हल्ली तो काहासा । झाला आहे. तसेच लघुकाकिक धूमकेतूंस म्हणण्यासारखें पुच्छ नसते, यावरून वरील अनमान खरे ठरते. तथापि आकार एकदम फार लहान हात असला नाही. मोठेही पच्छ बनण्यास फार थोडे द्रव्य पुरण्याजोगे असते. आकार 5 त्तरोत्तर कमी होत जातो यामळे एकदां पाहिलेला धूमकेतु केवळ बाह्यस्वरूपावरून दसऱ्या खेपेस ओळखेल असा नियम नाही. कक्षेच्या स्थितीवरून म्हणज मुख्यतः तिची केंद्रच्युति व विक्षेप यावरून तो ओळखतात. एकाद्या धूमकेतूच्या स्वारीने वेगाने येऊन पृथ्वीला आलिंगन दिले तर काय वाट होईल असें भय वारंवार पडले आहे. परंतु तो धूमकेतु ज्या प्रकारचा असेल व त्याचा जो भाग पृथ्वीवर आपटेल त्याप्रमाणे निरनिराळे परिणाम होतील. धूमकेतूच्या पुच्छांतून पृथ्वी निघून गेली तरी काही परिणाम होणार नाही. अशी गोष्ट आजपर्यंत काही वेळां झालीही असेल. कदाचित् कांहीं उल्कापात होईल. दुर्बिणकेतूतून पृथ्वी गेली तर फार मोठा उल्कापात होईल एवढेच. त्याहून भयंकर कांहीं होणार नाही. परंतु मोठ्या केतच्या तारेशी पृथ्वीचे युद्ध झाले तर मात्र धडगत नाही. तो वातावरणांत शिरतांच सर्व आकाश हजारो सूर्याहून तेजस्वी होईल. आणि इ