पान:ज्योतिर्विलास.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

च्याति असेल ती असो, कोणाचे तसे मतदांत जसे मासे तसे * थोडेच आजरोज एकादा भात तरी केतु आपल्या सूर्यमाशांत धूमकेतु , धूमकेतु. १७५ वर्षात ५०० केतु दिसले, या मानाने आमच्या ग्रंथांतले केतूंविषयी लेख निदान इ० सनापूर्वी ३८०० वर्षांपासून आहेत. केप्लरचे मत असें होते की, समुद्रांत जसे मासे तसे आकाशांत धूमकेतु पसरले आहेत. हल्लीही कोणाचे तसे मत आहे. आपल्या सूर्यमालेच्या बाहेर काय स्थिति असेल ती असो, परंतु आंत तरी केतु अगण्य नाहीत. असते तर सांप्रतच्या दुर्बिणीतून रोज एकादा तरी दिसता. तथापि एकंदर जे धूमकेतु असतील त्यांपैकी थोडेच आजपर्यंत दिसले आहेत एवढें खरें. आतां युरोपियन ग्रंथाधारें प्रसिद्ध धूमकेतूंविषयी काही सांगतों. इसवी सनापूर्वी ४३ या वर्षी एक धूमकेतु दिसत होता. तो जुलिअस सीझरचा आत्मा स्वर्गास जात आहे असे काही लोकांनी मानिलें. इ० स० ७९ ह्या वर्षी म्हणजे आपला शककाल सुरू झाला त्या वर्षी एक धूमकेतु दिसत होता. इ० सन ६३२ मध्ये म्हणजे मुसलमानांचा पैगंबर महंमद हा स्वर्गास गेला त्या वर्षी एक धूमकेतु दिसत होता. इ० स०१००० ह्या वर्षी पृथ्वीचा लय होणार असे युरोप खंडांतील लोकांस पूर्वीपासून भय पडले होते. आणि त्याच वर्षी एक धूमकेतु दिसू लागला व एक मोठा उल्कापात झाला. मग काय विचारता ! जगाचा अंत खचित होणार असें सर्वास वाटले. परंतु सुदैवाने जग त्यांतून निभावले ! इ० स० १०६६ चा धूमकेतु विल्यम राजास अनुकूल होता. परंतु इंग्लंदास प्रतिकूल होता. कान्स्टांटिनोपल येथील रोमन बादशाही मुसलमानांनी बुडविली त्या सुमारास इसवी सन १४५५ मध्ये हालेचा धूमकेतु दिसत होता. ते दुश्चिन्ह पाहून धुमकेतूपासून आणि मुसलमानांपासून संरक्षण व्हावे म्हणून पोप महाराजांनी जिकडे तिकडे देवळांतून प्रार्थना सुरू करविल्या. बेलग्रेड येथे ख्रिस्ती लोक प्रार्थना करीत करीत लढत होते. परंतु धुमकेतूला दया न येऊन ४० हजार लोक समरांगणी पडले आ. णि मुसलमानांचा जय झाला ! हालेचा धूमकेतु पुष्कळ वेळां लोकांच्या भयास कारण झाला आहे. कधी तो वांकड्या तरवारीसारखा दिसे. कधी सरळ तरवारीसारखा दिसे. इ० स० १५२८ मध्ये एक धूमकेतु दिसत होता. त्याचे असे वर्णन आढळते:-" हा धूमकेतु फारच भयंकर होता. लोकांस त्याची इतकी भी ति वाटली की कांही त्या भीतीने एरव्हींच मेले. काहींना भयामुळे दुखणी ये ते मेले. तो फार लांब व रक्तासारखा लाल होता. त्याच्या अग्रभागी वांक हात होता व त्यांत तरवार होती. तिचा जणु काय आतां प्रहार करितो शी त्याने ती धरिली होती. तरवारीच्या टोकाशी तीन तारा होत्या. आ न्ही बाजूंस कित्येक कुल्हाडी, सुया, आणि तरवारी रक्ताने भरलेल्या होत्य तच माणसांची कांहीं भयंकर मुंडकी होती. त्यांवर राठ केस दिसत होते, तूच्या निरनिराळ्या अवयवांवर तरवारी इत्यादिकांची कल्पना लोकांनी केली गण्यास नकोच. इ० स० १६६४ आणि १६६६ च्या धूमकेतूंनी इंग रच प्रळय उडविला. लंदनांत इ० स०१६६५ मध्ये रोगाची भयंकर बार करितो आहे अतारा होत्या. आणि दोने भरलेल्या होत्या. त्यांमदिसत होते." के कांनी केली हे सांकेतंनी इंग्लंदांत फाची भयंकर सांथ आली, UP