पान:ज्योतिर्विलास.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. लेले आहेत. कांहीं चंद्रपुत्र आहेत. तसेच काही बुधादि पांच ग्रह, राहु, पृथ्वी, मृत्यु, ब्रह्मा, अग्नि, वायु, प्रजापति, वरुण, यांचे पुत्र आहेत. व कांहीं अंतरिक्षांत निरनिराळ्या दिशांपासून उत्पन्न होणारे दिक्पुत आहेत. " सांप्रतच्या युरोपियन ग्रंथांत ज्या प्रकारच्या केतूंची वर्णने आढळतात, तितके सगळे किंबहुना जास्तच प्रकार वराहमिहिराच्या वर्णनांत आले आहेत. त्याने एका केतूचे वर्णन असे केले आहे:-"चलकेतु प्रथम पश्चिमेस दिसतो त्याची शिखा दक्षिणेस असते व ती तिकडे एक अंगुल उंच झाली असते. तो जसजसा उत्तरेस जातो तसतसा मोठा दिसतो. सप्तर्षि, ध्रुव, आणि अभिजित् यांस स्पर्श करून मागे फिरतो आणि आकाशाच्या अर्धाचे आक्रमण करून दक्षिणेस दिसेनासा होतो. " बृहत्संहितेचा टीकाकार भटोत्पल ह्याने वरील अध्यायाच्या टीकेंत पराशरादिकांची पुष्कळ वचने दिली आहेत. त्यांतून कांहींचा अर्थ येथे देतो:-" पैतामह केतु पांचों वर्षे प्रवास करून म्हणजे एकदा दिसल्यावर पुन्हां ५०० वर्षांनी उदय पावतो. उद्दालक श्वेतकेतु ११० वर्षे प्रवास करून उदय पावतो. शूलाग्रासारखी शिखा धारण करणारा काश्यप श्वेतकेतु १५०० वर्षे प्रवास करून पद्मकेतु नामक धूमकेतु येऊन गेल्यावर पूर्व दिशेस उदय पावतो. त्याची शिखा अर्धप्रदक्षिणाकार असते. तो ब्राह्म नक्षत्र, ध्रुव, ब्रह्मराशि, आणि सप्तर्षि यांस स्पर्श करून व आकाशाच्या तिसऱ्या भागाचे आक्रमण करून अपसव्य मार्गे मागें जाऊन अस्त पावतो. अग्निपुत्र रश्मिकेतु १०० वर्षे प्रवास करून आवर्तकेतु येऊन गेल्यावर कृत्तिका नक्षत्री उदय पावतो." ह्यांत उद्दालक, काश्यप, ही नांवें केतूंस दिली आहेत ती त्या त्या ऋषींनी ते ते केतु प्रथम पाहिले किंवा त्यांचे उदयकाल ठरविले यावरून दिलेली आहेत हे उघडच आहे. सांप्रत युरोपांत जो ज्योतिषी प्रथम एकाद्या धूमकेतूचा शोध लावितो किंवा त्याचा वेध घेतो त्याचे नांव त्यास ठेवितात, त्याप्रमाणेच हे होय. अमुक काळी हे धूमकेतु दिसले असें वर्णन असते तर त्याचा विशेष उपयोग झाला असता हे खरे, तरी तसे नाही म्हणून हे सर्व कल्पित आहे असे कोणी म्हणेल तर तसें नाहीं असें पूर्वापर संदर्भादि गोष्टींचा विचार केल्यावरून मला वाटते. हजारांपैकी कांहीं केतु बुधादि ग्रह, पृथ्वी आणि सूर्य ह्यांपासून उत्पन्न झाले असे सांगितले आहे हे लक्षात आणण्यासारखे आहे. प्राक्टरचे मत यासारखेच आहे. - इसवी सनाच्या आरंभापासून आजपर्यंत नुसत्या डोळ्यांनी सुमारें पांचशे धूमकेतु दिसल्याचे लेख आहेत असे युरोपियन लोकांच्या ग्रंथावरून दिसते. म्हणजे सरासरी दर शतकांत २७ दृष्टीस पडले. तिसऱ्या व नवव्या शतकांत ४० हून जास्त दिसले. पांचव्या, आठव्या, आणि सतराव्या शतकांत १६ हून जास्त दि. सले नाहीत. शिवाय दुर्बीण निघाल्यापासून तिने सुमारे २५० केतु आजपर्यंत दिसले. दरसाल बहुधा ७८ नवे दृष्टीस पडतात. आमच्या ऋषींनी सांगितलेले १००० केतु ३० सना पूर्वीचे आहेत. १९००