पान:ज्योतिर्विलास.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धूमकेतु. १७३ तीतून निघालेल्या धूमकेतूस आपल्या सूर्यमालेत येण्यास ८० लक्ष वर्षे लागतील व त्याला २००००००००००००० मैल मार्ग क्रमावा लागेल. अतिदीर्घवर्तुळकक्षांच्या म्हणजे नियतकालिक धूमकेतूंपैकी काहींच्या कक्षांची उच्चे गुरूच्या जवळ आहेत असे वर सांगितलेच. काहींची शनि, प्रजापति आणि वरुण यांच्या जवळ आहेत. काहींची तर त्याच्याही पलीकडे आहेत. सूर्यमालेंतला शेवटचा ग्रह वरुण ह्याचे सूर्यापासून अंतर पृथ्वीच्या ३० पट आहे; आणि हालेच्या धूमकेतूच्या उच्चाचे अंतर ३५ पट म्हणजे सुमारे ३२६ कोटि मैल आहे. म्हणजे तो सूर्यापासून फार दूर जातो तेव्हां इतका जातो; आणि जवळ येतो तेव्हां फक्त सुमारे ५|| कोटि मैलांवर असतो. ह्याची सूर्यप्रदक्षिणा ७६ वर्षात होते. ह्यापेक्षा ज्यांचा प्रदक्षिणाकाल जास्त आहे ते ह्याच्यापेक्षाही सूर्यापासून दूर जातात. १८४४ च्या धूमकेतूचे उच्च सूर्यापासून ४०००० कोटि मैल अंतरावर आहे, आणि त्याचा प्रदक्षिणाकाल १ लक्ष वर्षे आहे. धूमकेतु नीची असतात तेव्हां त्यांचा वेग फार असतो. १८४३ च्या धूमकेतूचा वेग सेकंदांत ३५० मैल होता. पृथ्वी आपल्या कक्षेत सेकंदांत फक्त १८॥ मैल चालते. उच्ची असतां धूमकेतूंचा वेग थोडा असतो. काहींचा तर दर सेकंदास फक्त ९ फूट असतो. धूमकेतु आपल्या कक्षेत जसे दूर किंवा जवळ असतील त्या मानाने ते लहानमोठे दिसतात हे ठकिच आहे. परंतु त्यांचा वास्तविक आकार देखील सर्वत्र सारखा नसतो. लहानमोठा होतो. जसे जसे ते सूर्याजवळ येतात तसा तसा त्यांचा अग्रभाग लहान होत जातो, आणि ते सूर्यापासून दूर जातात तसा तो मोठा होतो. हालेचा धूमकेतु एकदां सूर्यापासून दूर जातांना एका आठवड्यांत ४० पट मोठा झाला. एनकेचा धूमकेतु तर एकदा १६ हजार पट मोठा झाला. पुच्छाचे ह्याच्या उलट आहे. केतु सूर्याजवळ येतो तसतसे ते वाढतें, दूर जातांना कमी हति. याप्रमाणे केतूचें तेजही तो सूर्याजवळ येतांना वाढते आणि दर जातांना कमी होते. धूमकेतूंचा विक्षेप म्हणजे क्रांतिवृत्ताशी कोन किती होतो याचा नियम नाही. पाहिजे तितका कोन होतो. यामुळे ते आकाशांत कोणत्याही भागांत कोणत्याही दिशेने फिरतात... आतां धूमकेतू संबंधे आमच्या प्राचीन ग्रंथांतली काही वर्णने देऊन मग इ. तरांच्या ग्रंथांकडे वळू. वराहमिहिराने ६२ श्लोकांचा एक सगळा अध्याय (बृ० सं० ११) धूमकेतूंच्या वर्णनाकडे लाविला आहे; त्यांत त्यांची स्वरूपें, संख्या, शुभाशुभ फले इत्यादि सांगितले आहे. त्यांत सांगितल्या सारखींच फलें युरोपियन ग्रंथांतही आढळतात. वराहमिहिर म्हणतो की " एकशेएक धूमकेतु आहेत असे काही ऋषि सांगतात; हजार आहेत असे काही सांगतात. सहस्रांपैकी काही सूर्यापासून झा