पान:ज्योतिर्विलास.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ ज्योतिर्विलास. मी होऊन ते लघुकालिक म्हणजे थोडक्या काळांत सूर्याभोवती प्रदक्षिणा करणारे बनतील. असे उदाहरण पुष्कळ शतकांत एकादें होईल, व आपल्यास तो धूमकेतु दिसेलच असा नियम नाही. परंतु दिसणारा असला तर त्याच्या योगाने नियतकालिक धूमकेतूंच्या संख्येत भर पडेल. सांप्रत सूर्यमालेतले जे नियतकालिक धूमकेतु माहीत आहेत ते सर्व वर सांगितल्या रीतीने ग्रहांच्या आकर्षणामुळे सूर्यमालेतले झाले आहेत की काय हे निश्चयाने सांगवत नाही, परंतु त्यांतील बहुतेकांच्या कक्षा कोणत्या तरी ग्रहांच्या कक्षेजवळून जातात, यावरून तसा संभव दिसतो. ज्या केतूंचा प्रदक्षिणाकाल आठ दहा वर्षांच्या आंत आहे त्यांस लघुकालिक म्हणतात. एकट्या गुरूच्या कक्षेच्या अगदी जवळ १२ लघुकालिक केतूंच्या कक्षेची उच्चे आहेत. त्यांत दहांची गुरुकक्षेच्या किंचित् बाहेर आहेत, दोहोंची आंत आहेत. इ० सन १७७० मध्ये असा एक धूमकेतु नुसत्या डोळ्यांनी दिसला. त्या वेळच्या त्याच्या गतीवरून त्याचा प्रदक्षिणाकाल गुरूच्या निम्मे म्हणजे सुमारे ६ वर्षे आहे असें गणिताने दिसून आले. परंतु तो बराच मोठा असतां पूर्वी कधी दिसला नव्हता व पुढे कधी दिसला नाही. यावरून गुरूने त्याची कक्षा फारच बदलून त्यास आमच्या दृष्टिप्रदेशाच्या आंत आणिलें व मग बाहेर लोटून दिले असे दिसते. ज्योतिष्यांस लघुकालिक केतु पाहिल्याने हाच आढळला. त्याचा शोध सन १७७० च्या पुढे करीत असतां आणखी लघुकालिक धूमकेतु सांपडले. त्यांत एनकेचा प्रथम सांपडला. त्याचा काल एनकेनें इ० सन १८१८ मध्ये निश्चित केला. पुढे दुसरे सांपडून त्यांचे काळ निश्चित झाले. प्रॉक्टर नामक प्रसिद्ध ज्योतिषी इंग्लंदांत होऊन गेला. तो नुकताच निवर्तला. त्याचे मत असें आहे की सांप्रत सूर्यमालेत जे नियतकालिक धूमकेतु आढळतात त्यांतले बहुतेक, आपली पृथ्वी व इतर ग्रह प्राचीन काळी सूर्यासारखे उष्ण होते तेव्हां, त्यांच्या पोटांतून उष्णद्रव्यवेगाने बाहेर पडून त्याचे बनले आहेत. पृथ्वीवर जीवांची उत्पत्ति होण्यापूर्वीच म्हणजे कोट्यवधि वर्षांपूर्वी ज्वालामुखीतून दर सेकंदास १०।११ मैल या वेगाने जड द्रव्य बाहेर फेंकण्याची शक्ति पृथ्वीच्या अंगी असावी व तेव्हां पुष्कळ धूमकेतु तिजपासून उत्पन्न झाले असावे. आपल्या सूर्यापासून व इतर स्थिर तारांपासून सांप्रतही असे धूमकेतु उत्पन्न होत असावे. सूर्यापासून निघालेले द्रव्य सेकंदास ३८२ मैल या वेगाने बाहेर पडले तर ते पुन्हां त्याच्या आकर्षणांत सांपडणार नाही. आणि सांप्रत दर सेकंदास ४५० मैल या वेगाने जडद्रव्य बाहेर फेंकण्याची शक्ति आपल्या सर्यास आहे. व त्याप्रमाणे कधीकधी बाहेर पडते असे आढळले आहे. इ० स०१८७२ मध्ये असे द्रव्य बाहेर पडले होते. अन्वस्त व अपास्त कक्षांचे धमकेतु कधी कधी आपल्या सूर्यमालेत येतात ते तारांपासून उत्पन्न झाले असावे. अशनींची उत्पत्ति ह्याप्रमाणेच आहे असे प्रॉक्टरचे मत आहे. दक्षिणक्षीतली सातवी तारा आल्फासेंटारी ही पृथ्वीला फार जवळ आहे.