पान:ज्योतिर्विलास.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धूमकेतु. चितला. तो फारच्या केतूचे नाव किंवा थोडेंच वाहसतो. त्यातही ज्यहणजे आ १७१ सून फार लांब असतो. आणि धूमकेतूचे द्रव्य फार विरळ असते यामुळे कोणताच धूमकेतु कक्षेच्या सगळ्या भागी दिसत नाही. सूर्याच्या अगदी जवळ म्हणजे आपल्या कक्षेत नीची येतो तेव्हां मात्र थोडे दिवस दिसतो. त्यांतही ज्याचे नीचस्थान पृथ्वीच्या कक्षेच्या आंत असते किंवा थोडेच बाहेर असते तो मात्र दिसतो. इसवी सन १७२९ च्या केतूचे नीचस्थान पृथ्वीच्या चौपट अंतरावर होतें तरी तो दिसला. तो फारच मोठा असेल म्हणून दिसला असावा. परंतु असे फार क्वचित् आढळतात. जे धूमकेतु आपल्यास दिसतात ते कक्षेच्या थोड्या भागी थोडे दिवस दिसतात. यामुळे त्यांचा वेग सूक्ष्मपणे समजत नाही. पुष्कळ धूमकेतूंचे वेग सेकंदास २६ मैलांच्या इतके जवळ जवळ आहेत की, ते त्याहून कमी आहेत की जास्त आहेत हे बरोबर समजत नाही. यामुळे त्यांच्या कक्षा अतिदीर्घवर्तुळ आहेत की अन्वस्त आहेत हे ठरविता येत नाही. काहींचे वेग २६ मैलांहून जास्त आहेत; परंतु फार थोडे जास्त आहेत; यामुळे त्यांच्या कक्षा अपास्तच आहेत असे निश्चयाने म्हणवत नाही. परंतु बहुतेक धूमकेतूंच्या कक्षा अतिदीर्घवतुळ असतील, व ते एकदां दिल्यापासून हजारों वर्षांनी का होईना परंतु केव्हां तरी पुनः सूर्याजवळ येतील, असा संभव आहे. यांत ज्यांचा प्रदक्षिणाकाळ थोडा असे थोडेच आहेत; तो काळ हजारों वर्षे असेल असेच पुष्कळ आहेत. व कांही तर अपास्तकक्षांचे असतील. ते कधी पुनः आपल्या सूर्याकडे येणार नाहीत. परंतु असे फार थोडे. धूमकेतु हे मूळचे आपल्या सूर्यमालेतले आहेत की सूर्यमालेच्या भोवती जो अनंत तारकाप्रदेश पसरलेला आहे त्यांतून आलेले आहेत व त्यांची उत्पत्ति कशी झालेली आहे ह्याविषयी सिद्धांत अद्यापि ठरले नाहीत. सांप्रत याविषयी असे मत आहे:-विश्वाच्या अपार प्रदेशांत तेजोमेघ पसरलेले आहेत; (त्यांचे विवेचन पुढे यईल. ) त्यांस गति आहे. व आपला सूर्यही ग्रहमालेसहवर्तमान आकाशांत कोणीकडे तरी वेगाने चालला आहे. यामुळे त्या तेजोमेघद्रव्याचे अंश अनादि कालापासून एकेक आपल्या सर्याच्या आकर्षणाने त्याजकडे येत आहेत ते हे धमकेत हात. दुसरे एक मत असे आहे की अशनींच्या द्रव्याचे धूमकेतु बनले आहेत. किवा ते अशनिसंघात्मकच आहेत; आणि ते आकाशांत सर्वत्र पसरलेले आहेत: व कधी कधी सूर्याच्या आकर्षणांत सांपडतात. सूर्याभोवती ग्रह नसते तर त्याच्या आकर्षणांत सांपडलेले धूमकेत अन्वस्तकक्षेने त्या भोवती फिरून परत गेले असते व -पुनः आले नसते. किंवा एकदा आले तसे कदाचित् कोव्यवधि वर्षांनी पुनः आले असते. परंतु ग्रहांच्या उपाधीमळे त्यांच्या गति कमजास्त होतात. सूर्यमालेत शिरतांना किंवा तांतून परत जातांना त्यांची दिशा जशी असेल त्या मानाने उपाधि कमजास्त होईल. त्यांचा वेग दर सेकंदास २६ मैलांहून कमी किंवा जास्ती ज्या मानाने होईल त्या मानाने त्यांच्या कक्षा बनतील. ते जर एकाद्या ग्रहाच्या व त्यांतही गुरूसारख्या मोठ्या ग्रहाच्या अगदी जवळून जातील तर त्यांचा वेग फार क तही गुरूसारख्या मानाने त्यांच्या कक्षा बनतील. मैलांडून कमी किंवा