पान:ज्योतिर्विलास.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्या होतो. परंतुनाड्याशा सेकंदाता त्यास मिळाहरून आंत ज्योतिर्विलास. नाही. तर इतकी तापलेली हवा लागली म्हणजे जे कार्य व्हावयाचे ते होऊं लागते. अशनि दाह्य नाहीत. तरी ह्या भयंकर उष्णतेने तत्काळ जळू लागतात आणि मोठा प्रकाश उत्पन्न होतो. ह्याप्रमाणे ते उल्कारूपाने आपल्यास दिसतात. अशनि लहान असला तर त्याचे सगळे द्रव्य जळून तो वातावरणाच्या अगदी वरच्या भागांतच नाहीसा होतो. त्याहून मोठा असला तर बराच खाली येऊन नाहीसा होतो. परंतु तो बराच मोठा असला तर त्याचे सर्व द्रव्य वितळून त्याची वाफ होण्यापूर्वीच थोड्याशा सेकंदांतच तो पृथ्वीवर येऊन पोचतो. आणि त्याची गति बंद झाली म्हणजे जास्त उष्णता त्यास मिळेनाशी होऊन तो काही वेळाने निवतो. अशनि मोठ्या वेगाने वातावरणाच्या बाहेरून आत शिरतात तेव्हां आघातामुळे कधी कधी ते फुटून त्यांच्या निरनिराळ्या उल्का बनतात. व हा आघात होतांना केव्हां केव्हां मोठी गर्जना होते. विजेच्या वेगाने वातावरणांतून अशनि खाली येतात. यामुळे त्यांचा वेग इत्यादि गोष्टी सूक्ष्मपणे समजत नाहीत. तरी अनेक अनुभव घेतल्यावरून असे दिसून आले आहे की, पृथ्वीपासून सुमारे ७५ मैल उंचीवर अशनि जळू लागतात. ते तिरपे खाली येत असतात. तसे सुमारें शेपन्नास मैल जाऊन सुमारे १५ मैल उंचीवर नाहीसे होतात. शंभर मैलांहून अधिक उंचीवर उल्का दिसं लागल्याचे फारसे आढळत नाही. मोठाले अशनि १५ मैलांहूनही खाली येऊन नाहीसे होतात. फार मोठे असतात ते पृथ्वीवर येऊन पोचतात. त्यांचा वेग दर सेकंदास सुमारे २० पासून ४५ पर्यंत मैल असतो. इतक्या वेगानें आगगाडी चालली तर एका पळांतच मुंबईहून काशीस जाईल. ध्वनि एका मिनिटांत सुमारे तेरा मैल जातो. यामुळे काही अशनि वातावरणांत शिरल्यावर जी गर्जना होते ती आपल्यास ऐकू येण्यास कधी कधी सात आठ मिनिटे लागतात. आकाशांतल्या अशनींचा व्यास सुमारे १०० पासून १३००० फूट असतो; म्हणजे सूर्यमालेतल्या इतर पदार्थांच्या मानाने पाहिले तर अशनि फारच लहान होत. अशनींच्या आकारांपेक्षा त्यांचे वजन काढणें ज्योतिष्यांस सोपे आहे. अ. शनीचा वेग समजला असता त्यांचा प्रकाश मोजून वजन काढितात. काही अशनि कांहीं तोळे मात्र वजन असतात. परंतु कांही तर कांहीं मण वजन असतात. अंशतः वितळून पृथ्वीवर येऊन पोचलेले अशनि कांहीं टन वजन भरतात असे आपण वर पाहिलेच आहे. अर्थात् आकाशांत असतां त्यांचे वजन पुष्कळ जास्त असले पाहिजे. उत्कांचे वर्णलेख घेतले आहेत त्यावरून असे दिसून आले आहे की काही उल्का घनावस्थेत असतात. परंतु बहुतेक उल्का वायुरूप असतात. व त्यांत सोडिअम् , पोटॅश, गंधक, फॉस्फरस इत्यादि तत्वे असतात. पेटण्यापूर्वी अशनि घनावस्थेत असतात असे दिसून येते. ।