पान:ज्योतिर्विलास.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उल्का . हे अशनि फार महत्त्वाचे होत. ह्याकरितां त्यांचा संग्रह करून त्यांची परीक्षा करण्याचे प्रयत्न सांप्रत काळी चालू आहेत. इंग्लंदांत ब्रिटिश म्युझिअम नांवाच्या अजबखान्यांत ह्या अशनींचा मोठा व उत्कृष्ट संग्रह आहे. तसा पृथ्वीवर दुसरे कोठेही नाही. तो दिवसेंदिवस वाढतच आहे. हिंदुस्थानांतही असे पाषाण पडतील तेव्हां त्यांचा संग्रह करून ते भूस्तरशोधन खात्याच्या मार्फत इंग्लंदांतल्या अजबखान्यांत पाठविण्याची व्यवस्था सरकारानें इ० स० १८६३ पासून केली आहे. शिवाय त्या खात्यामार्फत कलकत्ता येथे अशा दगडांचा चांगला संग्रह झाला आहे. मुंबई येथेही व्हिक्टोरिया म्युझिअममध्ये असे काही दगड आहेत. अशनि मुख्यतः दोन प्रकारचे असतात. एका प्रकारच्या अशनीचे प्रकृत्यंश बहुधा पाषाणाचे असतात. त्यांत कांही लोखंडाचे कण असतात. असे अशनि आकाशांतून पडतांना पुष्कळ आढळतात. दुसऱ्या प्रकारच्या अशनीत बहुतेक लोखंड असते. हे आकाशांतून पडतांना फारसे दिसत नाहीत. तरी पृथ्वीवर असे दगड पुष्कळ आहेत. व ते आकाशांतनच आलेले आहेत याविषयी संशय नाही. अशनीचे रसायनपृथक्करण केल्यावरून असे दिसून आले आहे की, त्यांत जरी पृथ्वीवरील तत्त्वांहून निराळी तसे नसतात, तरी त्यांचे संयोग पृथ्वीवर आढळत नाहीत असे असतात. व त्या संयोगांत काही विशेष प्रकार अशनीमध्ये आढकन येतो. त्यावरून अमुक पदार्थ अशनि आहे हैं तच्छास्त्रकोविदांस निश्चयाने सांगतां येते. मेक्सिको देशांत प्राचीन काळी पडलेले पुष्कळ अशनि आढळले आहेत. हिंदुस्थान, युरोप, अमेरिका, अशा निरनिराळ्या स्थळी पडलेल्या अशनीची द्रव्ये बहुधा एकसारखी असतात. त्यांत १०० भागांत ४० भाग सिलिका, २५ भाग घनवर्धनीय लोखंड, ६ पासून ८ भाग निकेल आणि थोडेसें अशोधित लोखंड असते. व दुसरी सात तत्त्वे निरनिराळ्या मानांनी असतात. अशनि निरनिराळ्या आकाराचे व निरनिराळ्या वजनाचे असतात. काही आंब्या एवढाले असतात; व कांही तर बरेच मण वजन असतात. इ० स० १८६५ मध्ये ३॥ टन वजनाचा एक अशनि ब्रिटिश अजबखान्यांत आला आहे. आणि दक्षिण अमेरिकेत १५ टन वजनाचा एक अशनि आढळला आहे. त्याची लांबी ७ फूट आहे. ज्याने कधी उल्कापात पाहिला नाही किंवा त्याविषयी काही ऐकिले नाही त्याला अकस्मात् आकाशांतली एकादी तारा तुटलेली पाहन साहजिकच भीति वाटेल. मग तारांची वृष्टि पाहून तर जगाचा अंत होतो की काय असें त्यास वाटले तर नवल नाही. उल्कापात झाला म्हणजे एकादी भयंकर गोष्ट व्हावयाची अशा प्रकारच्या समजुती होण्याचें मूळ हेच आहे. असे ग्रह सर्व राष्ट्रांत होते व आहेत. आपल्या पुराणादिकांत उल्कापाताची वर्णने पुष्कळ आहेत. वराहमिहिराने तर एक सगळा अध्याय (बृ० सं० ३३ ) ह्या उत्पाताच्या वर्णनाकडे दिला आहे. व