पान:ज्योतिर्विलास.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अग्रहास नांव द्यावे, अटर्न ही युरोपियनच्याही पली युरेनस आणि नेप्चुन्ः १. सन १७८१ च्या मार्चच्या १३ व्या तारखेस तो मिथुन राशीतील तारा पहात असतां इतरांपेक्षा मोठी एक तारा त्यास दिसली. तेव्हां ती स्थिर तारांपैकी नव्हे, असा त्यास संशय आला. या वेळी २२७ प्रभावाच्या ( पदार्थ मूळच्याहून इतके पट मोठा दाखविणाऱ्या) भिंगांतून तो पहात होता. अधिक प्रभावाच्या भिंगांतून ग्रहांचे व्यास ज्या मानाने मोठे दिसतात, त्या मानाने तारांचे दिसत नाहीत, असा त्यास अनुभव होता. त्यावरून तेव्हांच २००० पर्यंत प्रभावाच्या भिंगांतून पाहिल्यावरून त्याची खात्री झाली की, ती तारा स्थिर तारांपैकी नाही. तो धूमकेतु आहे, असे त्यास वाटले. पुढे काही दिवसपर्यंत त्याच्या गतीचे गणित झाल्यावरून तो ग्रह आहे असे समजले. इंग्लंदचा राजा तिसरा जार्ज याच्या कारकीर्दीत हा ग्रह सांपडला. व त्या राजाचा हर्शल ह्यास आश्रय होता. म्हणून त्याने जार्ज हे नांव नव्या ग्रहास द्यावें असे सुचविलें. इतर देशांतल्या ज्योतिष्यांनी नवीन ग्रहास त्याच्या शोधकाचे ह ल हेच नांव ठेविलें. ही दोन्ही नांवें कांही वर्षे चालली. इतर ग्रहांस पाश्चात्यांची जी नांवे आहेत, ती प्राचीन ग्रीक आणि रोमन लोकांच्या देवतांची आहेत. त्याप्रमाणेच ह्या ग्रहास नांव द्यावे, असा विचार पुढे निघाला. आमचे गुरु आणि शनि ह्यांस अनुक्रमें जुपिटर आणि सॅटर्न ही युरोपियन नांवें आहेत. प्राचीन ग्रीक देवतांत सॅटने हा जपिटरचा पिता होय. म्हणून सॅटर्नच्याही पलीकडे असणाऱ्या ग्रहास सँटनेचा पिता म्हणजे जपिटरचा पितामह आणि सर्व देवांमध्ये वडील जो युरेनस ह्याचे नांव द्यावे असा विचार होऊन त्याप्रमाणे देण्यात आले. युरेनसच्या पलीकडे आणखी एकादा ग्रह असेल, अशी त्या वेळेस कल्पनाही नव्हती. परंतु आणखी ग्रह सांपडला, तेव्हां त्यास जुपिटरचा पितामह युरेनस ह्याचे नांव देऊन १७८१ मध्ये सांपडलेल्या ग्रहास जुपिटरचा कनिष्ट बंधु नेपचुन् ह्याचें नांव द्यावें असा विचार निघाला. परंतु बरीच वर्षे चाललेलें नांव बदलणे गैरसोईचे म्हणन तें तसंच राहून शेवटच्या ग्रहास नेप्चुन हे नांव दिले. ___ आमचे कै० वा. मित्र जनार्दन बाळाजी मोडक ह्यांनी युरेनस आणि नेप्चुन् ह्यांस यथाक्रम प्रजापति आणि वरुण ही नांवें योजिली होती. युरेनस हा जुपिटरचा पितामह होता. आमचा प्रजापति हा सगळ्या प्रजांचा पितामह होय. ता बुधादिकांहून प्राचीन आहेच. आणि नेपचुन् ही जलाची देवता होती. आम.. चा वरुणही जलाची देवता आहे. युरेनसपेक्षां नेपचुन् प्राचीन नाही, ही यरोपि. यन नांवांत अडचण आहे तीही संस्कृत नांवांत नाही. कारण प्रजापतीपेक्षां वरुण हा प्राचीन व श्रेष्ठ आहे असे म्हणण्यास हरकत नाही. तेव्हां युरेनस आणि नेपचुन् ह्यांस प्रजापति आणि वरुण ह्या संज्ञा योग्य आहेत. प्रजापतीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास ८४ वर्षे लागतात. तथापि त्याचा शोध लागून फार वर्षे झाली नाहीत, तोच त्याचे सर्व प्रकारचे गणित ज्योतिप्यांनी केले. इतकें सामर्थ्य त्यांस आकर्षणनियमाच्या शोधामुळे आले होते. त्या